मैदानावर रक्ताचा सडा! रन आऊटच्या वादातून अंपायरला चाकूने संपवलं; क्रिकेट विश्वाला हादरवून सोडणा

क्रिकेट सामना जीवघेणा ठरला: भारतामध्ये एका बाजूला आयपीएलचा 2026 (Indian Premier League) थरार शिगेला पोहोचला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि पंजाब किंग्सच्या धडाकेबाज कामगिरी करत चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला आंध्र प्रदेशातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथे स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यात अंपायरची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे क्रीडा क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

रन आऊटच्या वादातून अंपायरला चाकूने संपवलं

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी एका स्थानिक क्रिकेट सामन्यात 21 वर्षीय डोला अजित बाबू आपल्या मित्र बुडूमुरी चिरंजीवीसोबत अंपायरिंग करत होता. सामन्यादरम्यान रनआउटच्या निर्णयावरून खेळाडूंमध्ये वाद निर्माण झाला. मात्र अजित बाबू आणि चिरंजीवी यांनी मध्यस्थी करून परिस्थिती शांत केली. यानंतर कांता किशोर नावाच्या एका प्रेक्षकाने संतापाच्या भरात अंपायर आणि खेळाडूंशी वाद घालत शिवीगाळ केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, सामना संपल्यानंतर कांता किशोरने वाद मिटवण्याच्या बहाण्याने अंपायरांना दुसऱ्या ठिकाणी बोलावले. अजित बाबू आणि चिरंजीवी काही मित्रांसह त्या ठिकाणी गेले, पण तिथे पुन्हा वाद चिघळला. याच दरम्यान कांता किशोरने चाकू काढून दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात अजित बाबू यांच्या छातीत वार करण्यात आला, ज्यामुळे तो घटनास्थळीच कोसळला. स्वतःचा बचाव करताना चिरंजीवी गंभीर जखमी झाला. मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणखी एका व्यक्तीलाही दुखापत झाली.

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अजित बाबूची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना Apollo Hospital येथे हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे स्थानिक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

हे ही वाचा –

MS Dhoni Fitness Test IPL 2026 : आधी टेस्ट, मगच एन्ट्री! सलग 3 पराभवांच्या नामुष्कीनंतर MS धोनी मैदानात उतरणार, पण अट ऐकून सगळेच चक्रावले

आणखी वाचा

Comments are closed.