IPL 2026: दुखापतीनंतर उमरान मलिक आणि मयंक यादवचं पुनरागमन, वेगाच्या जोरावर फलंदाजांना धडकी भरवणार

भारतीय क्रिकेटमध्ये आपल्या वेगाने फलंदाजांना धडकी भरवणारे वेगवान गोलंदाज फार कमी पाहायला मिळाले आहेत. सध्याच्या काळात असे २ वेगवान गोलंदाज दिसत आहेत, जे आपल्या स्पीडने फलंदाजांच्या मनात भीती निर्माण करू शकतात. ते गोलंदाज दुसरे तिसरे कोणी नसून उमरान मलिक आणि मयंक यादव आहेत. उमरान मलिक आयपीएल २०२६ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडून खेळणार आहे, तर मयंक यादव लखनऊ सुपर जायंट्ससाठी खेळताना दिसणार आहे. या दोन्ही गोलंदाजांवर सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतील.

​वेगवान गोलंदाज उमरान मलिक गेल्या हंगामातही केकेआरचाच भाग होता, पण दुखापतीमुळे (इंजरी) तो खेळू शकला नव्हता. आता तो पूर्णपणे फिट दिसत आहे. मलिकमध्ये आपल्या वेगाने प्रतिस्पर्ध्यांना घाबरवण्याची क्षमता आहे. अशा परिस्थितीत, तो यावेळी ताशी १६२ किमी वेगाने गोलंदाजी करून शोएब अख्तरचा विक्रम मोडीत काढू शकतो. दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादव देखील गेल्या हंगामात दुखापतीमुळे बहुतेक सामने खेळू शकला नव्हता, पण यावेळी तो पूर्णपणे तंदुरुस्त दिसत आहे. त्यामुळे तोदेखील शोएब अख्तरचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.

Comments are closed.