भयंकर! गाझामध्ये दिवसाला 28 मुलांचा मृत्यू, संयुक्त राष्ट्रांचा भयावह अहवाल

गाझामध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा सर्वाधिक फटका तेथील सामान्य नागरिकांना बसत आहे. चालू संघर्ष आणि मानवी मदत पुरवण्यावर असलेले निर्बंध यामुळे गाझामध्ये दररोज अंदाजे 28 मुलं मारली जात आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून ही भयावह माहिती समोर आली आहे.
बॉम्बस्फोट, कुपोषण, उपासमारी, मदत आणि महत्वाच्या सेवांच्या अभावांमुळे दररोज सरासरी 28 मुले मारली जात आहेत. गाझाच्या मुलांना अन्न, पाणी, औषध आणि संरक्षणाची आवश्यकता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांना आता युद्धबंदीची आवश्यकता आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या बाल निधी (युनिसेफ) ने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
हमासने 7 ऑक्टोबर 2023 रोजी दक्षिण इस्रायलवर हल्ला केल्यापासून, गाझामध्ये 18 हजारांहून अधिक मुले मारली गेली आहेत. अल जझीराच्या माहितीनुसार दर तासाला अंदाजे एक मूल, एकूण 60,933 पेक्षा जास्त पॅलेस्टिनी मृत्यू आणि दीड लाखांहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. बुधवारी गाझामध्ये इस्रायली हल्ल्यांमध्ये किमान 83 लोक ठार झाले.
संयुक्त राष्ट्रांच्या तज्ञांनी आणि 150 हून अधिक मानवतावादी संघटनांनी मदत पोहोचवण्यासाठी आणि उद्धवस्त होणारी पिढी रोखण्यासाठी गाझामध्ये कायमस्वरूपी युद्धबंदीची मागणी केली आहे.
Comments are closed.