संसदेच्या आवारात विनापरवाना वाहन प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे

बूम बॅरियर कोसळल्याने गोंधळ : सुरक्षा यंत्रणा अलर्ट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू असताना संसद परिसरात पास नसलेले एक वाहन दाखल झाल्याने गोंधळ उडाला. यानंतर तेथे खळबळ उडाली आणि त्वरित बूम बॅरियर सक्रीय झाले तसेच सुरक्षा व्यवस्था आणखी सतर्क झाली.

दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू असताना संसदेच्या परिसरात पास नसलेले वाहन दिसून आले. ही माहिती सुरक्षा कर्मचाऱ्यांना मिळताच गोंधळ उडाला. पास नसताना हे वाहन संसद परिसरापर्यंत कसे पोहोचले असा प्रश्न उपस्थित झाला. तर संबंधित वाहन सुरक्षा यंत्रणांनी रोखले आणि त्याची तपासणी केली आहे. यात  काहीच आक्षेपार्ह आढळून आले नाही. तर दुसरीकडे जोरदार वाऱ्यांमुळे बूम बॅरियर सक्रीय झाले होते.

देशाच्या सर्वात सुरक्षित इमारतींपैकी एक संसद परिसरात अचानक सुरक्षा सायरन वाजू लागल्याने खळबळ उडाली. संसदेच्या प्रवेशद्वारावर बसविण्यात आलेला एक बूम बॅरियल अचानक खाली कोसळला. बॅरियर कोसळताच तेथील ऑटोमॅटिक सुरक्षा सायरन वाजू लागला होता. हा आवाज ऐकताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रोटोकॉलचे पालन करत संसद परिसरात वाहनांच्या प्रवेशावर बंदी घातली. अचानक प्रवेश थांबविण्यात आल्याने प्रवेशद्वाराबाहेर वाहनांच्या रांगा लागल्या आणि काही काळासाठी अफरा-तफरीसारखी स्थिती निर्माण झाली. सुरक्षा पथकाने त्वरित तेथे पोहोचून पूर्ण प्रकरणाची चौकशी केली.

Comments are closed.