IND Vs PAK – हिंदुस्थान वरचढचं; यंग ब्रिगेडनेही पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या, 90 धावांनी सामना जिंकला

आशिया चषकाच्या 19 वर्षांखील स्पर्धेत हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आज दुबईमध्ये लढत झाली. या सामन्यात हिंदुस्थानने पाकिस्तानचा एकतर्फी धुव्वा उडवून दिला आणि 90 धावांनी दणक्याच विजयी जल्लोष केला. दीपेश आणि कनिष्क यांनी घातक गोलंदाजीपुढे पाकिस्तानच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली आणि संपूर्ण संघ अवघ्या 150 धावांवर बाद झाला.
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने सर्वबाद 240 धावा केल्या होत्या. आरोज जॉर्जने एकाकी झुंज देत 85 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तसेच कर्णधार आयुष म्हात्रे (38) आणि कनिष्क चौहान (46) यांच्याव्यतिरिक्त इतर कोणालाही चांगली फलंदाजी करता आली नाही. त्यामुळे 46.1 षटकांमध्ये संघ 240 धावांवर बाद झाला आणि पाकिस्तानला 241 धावांचे आव्हान मिळाले. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानी फलंदाजांना टीम इंडियाने मैदानावर टिकू दिले नाही. दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेत पाकिस्तानचा अर्धा संघ तंबुत धाडला. तसेच किशन कुमार सिंग, खिलान पटेल आणि वैभव सूर्यवंशी यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत संघाच्या विजय निश्चित केला. त्यामुळे पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या 150 धावांवर बाद झाला.
ग्रुप ए मध्ये हिंदुस्थानसह पाकिस्तान, युएई आणि मलेशिया या संघांचा समावेश आहे. पाकिस्तानला धुळ चारल्यामुळे गुणतालिकेत टीम इंडियाने 4 गुणांसह पहिला क्रमांक पटकावला आहे. टीम इंडियाने आतपर्यंत दोन सामने खेळले असून दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

Comments are closed.