ज्यांनी काहीच विशेष कामगिरी केली नाही ते घेतायत रोहित-कोहलीच्या भविष्याचा निर्णय! हरभजन सिंगचं मोठं वक्तव्य

माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंगला हे दुर्दैवी वाटतं आहे की, रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गजांचे भविष्य ते लोक ठरवत आहेत, ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काही खास कामगिरी केलेली नाही (Harbhajan Singh on Rohit Sharma & Virat Kohli). पण त्याने आशा व्यक्त केली आहे की, ही जोडी 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत (ODI World Cup) खेळत राहील.

रोहित सध्या 38 वर्षांचा आहे आणि विराट कोहली 37 वर्षांचा आहे. हे दोघे आता फक्त एकदिवसीय स्वरूपात खेळतात. ते एकदिवसीय विश्वचषकापर्यंत खेळणार की नाही, याबद्दल सध्या चर्चा सुरू आहे.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach of team india Gautam Gambhir) आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (cheif Selecter Ajit Agarkar) यांनी हे दोघे विश्वचषकापर्यंत खेळत राहतील की नाही, याबद्दल कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.

हरभजन म्हणाला, हे माझ्या आकलनाबाहेरचे आहे. मी याचे उत्तर देऊ शकणार नाही, कारण मी स्वतः एक खेळाडू राहिलो आहे आणि जे मी पाहत आहे ते माझ्यासोबतही घडले आहे. माझ्या अनेक सहकाऱ्यांसोबत असे झाले आहे, पण हे खूप दुर्दैवी आहे. आम्ही याबद्दल बोलत नाही किंवा चर्चा करत नाही. भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये 417 विकेट्स घेणाऱ्या हरभजनने कोहली आणि रोहितसोबत होत असलेल्या वागणुकीबद्दल दुःख व्यक्त केले. तो म्हणाला, जेव्हा मी विराट कोहलीसारख्या खेळाडूला पाहतो, जो अजूनही शानदार कामगिरी करत आहे, तेव्हा मला खूप आनंद होतो. पण हे थोडं दुर्दैवी आहे की, ज्या लोकांनी त्यांच्या कारकिर्दीत काही खास मिळवले नाही, ते लोक त्यांच्या भविष्याबद्दल निर्णय घेत आहेत.

एकदिवसीय विश्वचषकाला अजून एक वर्षांहून अधिक कालावधी बाकी आहे. हरभजनने रोहित आणि कोहलीला पाठिंबा देत म्हटले की, ते या विश्वचषकादरम्यान उत्कृष्ट फॉर्ममध्ये असतील आणि पुढील पिढीसाठी उच्च मानक (Standard) स्थापित करतील. कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सध्याच्या मालिकेत मायदेशात सलग दोन शतके लगावली आहेत, तर रोहितने मागील चार डावांमध्ये दोन अर्धशतके आणि एक शतक केले आहे.

हरभजन म्हणाला, त्यांनी नेहमीच धावा केल्या आहेत आणि भारतासाठी सुरुवातीपासूनच चांगले योगदान दिले आहे. त्यांनी फलंदाज म्हणून खूप चांगली कामगिरी केली आहे आणि संघाचे कर्णधार देखील राहिले आहेत. ते दमदार प्रदर्शन करत आहेत, हे पाहून मला खूप आनंद होत आहे. तो पुढे म्हणाला, ते युवा पिढीसाठी उदाहरण देत आहेत आणि चॅम्पियन बनण्यासाठी काय करावे लागते, हे दाखवत आहेत. त्यामुळे योग्य उदाहरण (Example) सादर केल्याबद्दल विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे अभिनंदन.

Comments are closed.