तुमचं उत्पन्न 12 लाखांपेक्षा कमी असूनही ‘या’ मार्गानं उत्पन्न मिळवल्यास कर भरावा लागेल, जाणून घ

नवी दिल्ली :केंद्रीय अर्थंमंत्री निर्मला सीतारामन यंनी नव्या करचनेत 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली. नव्या करचननेसंदर्भातील घोषणा करताना निर्मला सीतारामन यांनी नॉर्मल इन्कमवर  12 लाखांपर्यंत प्राप्तिकर द्यावा लागणार नाही असं म्हटलं. याचवेळी त्यांनी स्पेशल रेट इन्कम उदा. कॅपिटल गेन चा उल्लेख केल होता. हा उल्लेख बऱ्याच करदात्यांसाठी महत्त्वाचा आहे.

तुम्ही जर विचार केला की आता तुमचं सर्व मार्गांनी  येणारं करमुक्त उत्पन्न 12 लाख रुपये आहे तर तुमची फसगत होण्याची शक्यता आहे. भारतीय आयकर कायद्याच्या  87 ए नुसार 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. मात्र, ही सूट स्पेशल रेट इन्कम वर लागू होत नाही.  लॉटरी किंवा इक्विटीमधून झालेली कमाई स्पेशल रेट इन्कममध्ये येते. याशिवाय शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लाँग टर्म कॅपिटल गेन देखील यामध्येच येतो. यामुळं जर तुमचं उत्पन्न 12 लाखांपेक्षा कमी असेल. तुमच्या उत्पन्नाचा काही भाग शॉर्ट टर्म कॅपिटल गेन किंवा लाँग टर्म कॅपिटल गेन मधून आला असल्यास तुम्हाला कर द्यावा लागेल.

तुम्हाला 12 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असून कर द्यावा लागेल, जाणून घ्या कसं?

हे आपण एका उदाहरणावरुन समजून घेऊ शकतो. राजेश नावाच्या व्यक्तीचं उत्पन्न 8 लाख रुपये आहे. याच वर्षी त्याला लॉटरीतून 3 लाख 50 हजार रुपये मिळाले आहेत. तर राजेशचा इन्कम टॅक्स शून्य होणार नाही. राजेशला साडेतीन लाखांवर 10 टक्क्यांच्या हिशोबानं कर द्यावा लागेल. म्हणजेच 35 हजार रुपये कर आयकर विभागाकडे द्यावा लागेल. इक्विटीमधून मिळालेल्या  उत्पन्नावर शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म कॅपिटल गेनवर कर द्यावा लागेल. किती कर द्यावा लागेल आयकर कायदा सेक्शन 111ए आणि 112 नुसार ठरतं.

अर्थसंकल्पातील 87-ए रिबेट समजून घ्या

सर्वत्र 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, यासंदर्भातील तांत्रिक बाबी माहिती असणं आवश्यक आहे. प्राप्तिकर कायदा सेक्शन 87-ए नुसार चार लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर शुन्य आहे. 4 ते  8 लाख रुपयांपर्यंत कर 5 टक्के आहे. म्हणजेच 8 लाख उत्पन्न असल्यास 20 हजार रुपये कर लागेल.

8 ते 12 लाखांपर्यंत 10 टक्के कर लागेल म्हणजेच 12 लाख रुपये उत्पन्न असल्यास  40 हजार कर लागेल. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर कायदा 87 ए नुसार 60 हजार रुपयांची रिबेट देण्यात आली आहे. मात्र, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लाँग टर्म कॅपिटल गेनवर रिबेट मिळत नाही. जर तुमचं उत्पन्न 12 लाखांपेक्षा कमी असेल आणि तुम्हाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन किंवा लाँग टर्म कॅपिटल गेन मिळाला असेल तर कर द्यावा लागेल.

कोणत्या उत्पन्न गटाला किती टॅक्स

0 ते 4 – शून्य
4 ते 8 – 5 टक्के
8 ते 12 लाख – 10 टक्के
12 ते 16 लाख – 15 टक्के
16  ते 20 लाख – 20 टक्के
20 ते 24 लाख – 25 टक्के
24 लाखापुढे – 30 टक्के

इतर बातम्या :

Old Regime vs New Regime : नव्यांसाठी 12 लाखांचा टॅक्स फ्री पेटारा उघडला, पण ज्यांनी जुनी कर प्रणाली निवडली त्यांचं काय? जुनी प्रणालीच बंद केल्यास बचत, गुंतवणूक की खिशाला डबरा?

अधिक पाहा..

Comments are closed.