Union Budget 2025 : किसान क्रेडिट कार्ड कोणाला मिळतं? कर्जाचे 5 लाख कुठे खर्च करता येतात?

केंद्रीय अर्थसंकल्प 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात विकसित भारताची संकल्पना मांडली. या अर्थसंकल्पात त्यांनी शेती क्षेत्रासाठी नवीन घोषणा केल्या आहेत. यामधील महत्वाची घोषणा म्हणजे किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाख रुपयांवरुन 5 लाख रुपये करण्यात आली आहे.

केसीसीसाठी सगळेच शेतकरी अर्ज करू शकतात

आतापर्यंत शेतकऱ्यांना शेतीसाठी किसान क्रेडिट कार्डवर फक्त 3 लाख रुपयांची मर्यादा मिळत होती. याशिवाय देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही देशाच्या सुस्त आर्थिक विकासाला गती देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. या वाढीव मर्यादेचा लाभ लवकरच शेतकऱ्यांना मिळेल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. केसीसीसाठी सगळेच शेतकरी अर्ज करू शकतात. यामध्ये स्वत:च्या मालकीची जमीन असणारे, इतरांची जमीन भाडेतत्वावर करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होतो.

KCC कर्जाचे पैसे कुठे खर्च करू शकता?

किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना अत्यंत स्वस्त व्याजदरात कर्ज दिले जाते. हे कर्ज शेतकऱ्यांना शेतीसाठी दिले जाते. अशा परिस्थितीत शेतकरी बियाणे, खते, कीटकनाशके आणि डीएपी शेतीसाठी खरेदी करण्यासाठी KCC मर्यादेचा वापर करू शकतात. देशात लहान शेतकरी मोठ्या संख्येने आहेत, ज्यामुळे त्यांच्याकडे शेतीसाठी पुरेसे पैसे नाहीत. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केसीसी योजना सुरू केली होती.

किसान क्रेडिट कार्ड योजना कधी सुरू झाली?

किसान क्रेडिट कार्ड योजना 26 वर्षांपूर्वी 1998 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत शेती व संबंधित कामे करणाऱ्या शेतकऱ्यांना 9 टक्के व्याजाने अल्पमुदतीचे कर्ज दिले जाते. या योजनेची विशेष बाब म्हणजे सरकार कर्जावरील व्याजावर 2 टक्के सूटही देते. त्याच वेळी, जे शेतकरी संपूर्ण कर्जाची वेळेवर परतफेड करतात, त्यांना प्रोत्साहन म्हणून आणखी 3 टक्के सवलत दिली जाते. म्हणजेच हे कर्ज शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के वार्षिक व्याजावर दिले जाते. 30 जून 2023 पर्यंत असे कर्ज घेणाऱ्यांची संख्या 7.4 कोटींहून अधिक होती. ज्यावर 8.9 लाख कोटींहून अधिकची थकबाकी दिसली.

महत्वाच्या बातम्या:

Union Budget 2025 : किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर; देशभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार!

अधिक पाहा..

Comments are closed.