12 लाख नव्हे 13.70 लाख रुपयांचं होणार, फक्त काम अन् मोठा फायदा, जाणून घ्या कसं?

केंद्रीय अर्थसंकल्प 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्राचा अर्थसंकल्प सादर करताना मोठी घोषणा केली. अर्थसंकल्पीय भाषण करताना मध्यमवर्गाला दिलासा देत करमुक्त उत्पन्न 12 लाखांपर्यंत वाढवत असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नव्या कररचनेच्या स्लॅबमध्ये बदल देखील जाहीर केले.  सरकारच्या घोषणेनुसार 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर द्यावा लागणार नाही. मात्र, एक काम करुन तुम्ही 13 लाख 70 हजार रुपयांचं उत्पन्न देखील करमुक्त ठेवू शकता. यासाठी नॅशनल पेन्शन स्कीमचा आधार संबंधित करदात्याला घ्यावा लागेल.

हे समीकरण जाणून घेण्यापूर्वी नव्या कररचनेतील बदल जाणून घेणं आवश्यक आहे.

कोणत्या उत्पन्न गटाला किती टॅक्स

0 ते 4 – शून्य
4 ते 8 – 5 टक्के
8 ते 12 लाख – 10 टक्के
12 ते 16 लाख – 15 टक्के
16  ते 20 लाख – 20 टक्के
20 ते 24 लाख – 25 टक्के
24 लाखापुढे – 30 टक्के

समजा एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 1 लाख ते 4 लाखांदरम्यान असल्यास त्याला कोणताही प्राप्तिकर भरावा लागणार नाही. मात्र, 4 लाख ते 8 लाख रुपयांदरम्यान उत्पन्न असल्यास 5 टक्के प्राप्तिकर लागेल. 8 ते 12 लाख रुपयांदरम्यान उत्पन्न असल्यास 10 टक्के प्राप्तिकर भरावा लागेल. 12 लाख ते 16 लाखांदरम्यान उत्पन्न असेल त्यांना 15 टक्के, 16 ते 20 लाखांदरम्यान 20 टक्के कर भरावा लागेल. 20 ते 24 लाख रुपये उत्पन्न असल्यास प्राप्तिकर 25 टक्के भरावा लागेल. 24 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असल्यास 30 टक्के कर द्यावा लागेल. नवी कररचनेचे स्लॅब बदलण्यात आले आहेत. त्याशिवाय 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर रिबेट असल्यानं कर भरावा लागणार नाही.

13.70 लाखांचं उत्पन्न कसं करमुक्त करायचं?

जुन्या कर रचनेत करदात्यांना गृहकर्जावरील व्याज, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, पोस्ट आणि एलआयसीमधील गुंतवणूक, घरभाडे अशा विविध प्रकारच्या खर्चावर प्राप्तिकरात सूट मिळत असे, मात्र, नव्या करचनेत याचा लाभ घेता येत नाही. नोकरदार वर्गाला स्टँडर्ड डिडक्शन 75 हजार रुपयांचं मिळतं. त्यामुळं तुमचा पगार कितीही असला तरी 75 हजार रुपयांवर कर भरावा लागत नाही. म्हणजेच तुम्हाला 12.75 हजार रुपयांपर्यंत करावा लागणार नाही.

तुम्ही जर तुमच्या कंपनीद्वारे नॅशनल पेन्शन सिस्टीम  मध्ये 80CCD(2) नुसार गुंतवणूक केल्यास सूट मिळवू शकता. खासगी  आणि सरकारी कंपन्यांतील कर्मचारी मूळ पगाराच्या टक्के रक्कम एनपीएसमध्ये गुंतवू शकतात.

समजा तुमचं पॅकेज 13.70 लाख रुपये आहे. अशा स्थितीत तुमचं मूळ वेतनं 6.85 लाख रुपये होईल. मूळ पगाराच्या  14 टक्के रक्कम म्हणजे 95900 रुपयांची गुंतवणूक एनपीएसमध्ये करता येईल. त्यामुळं तुम्हाला 13.70 हजार रुपयांवर 75 हजार रुपयांचं डिडक्शन मिळेल. याशिवाय कॉर्पोरेटेट एनपीएसमधून 95900 रुपयांची सूट मिळेल. म्हणजेच एकूण 170900 रुपयांची सूट अशा प्रकारे तुम्ही मिळव शकता. याप्रकारे तुमचं उत्पन्न 12 लाखांच्या खाली येईल. म्हणजेच 13.70 लाखांमधून 170900 वजा केल्यास 1199100 रुपये करपात्र उत्पन्न असेल. मात्र रिबेट लागत असल्यानं तुम्हाला कर द्यावा लागणार नाही.

अनेक कंपन्या एनपीएसची सुविधा देतात. तुम्ही कंपनीच्या एचआरकडे जाऊन एनपीएसमध्ये गुंतवणूक करु शकता. तुमच्या मूळ वेतनाच्या 14 टक्के रक्कम दरमहा एनपीएसमध्ये जाईल. यातून तुम्ही अतिरिक्त कर वाचवू शकता.

इतर बातम्या :

अर्थसंकल्पाचे संमिश्र पडसाद, एकीकडे शेअर बाजारात घसरण, दुसरीकडे सोने चांदीच्या दरात जोरदार तेजी

Income Tax : प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा 7 लाखांवरुन 12 लाख का केली? निर्मला सीतारामन यांनी उलगडून सांगितलं

अधिक पाहा..

Comments are closed.