Union Minister Resign| केंद्रीय मंत्री बिट्टू यांचा पदत्याग
► वृत्तसंस्था नवी दिल्ली
केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य नवनीतसिंग बिट्टू यांनी आपल्या मंत्रिपदाचा त्याग केला आहे. त्यांचे त्यागपत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
बिट्टू हे राजस्थानमधूर राज्यसभेवर निवडून आले होते. प्रथम ते काँग्रेसमध्ये होते. साधारणपणे दोन वर्षांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांनंतर त्यांना राजस्थानातून राज्यसभेवर पाठविण्यात आले होते.
त्यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कालावधी 18 जुलै 2026 या दिवशी संपला. मात्र, त्यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षाने तिकीट दिले नव्हते. त्यामुळे ते राज्यसभेचे सदस्य राहू शकणार नव्हते.
त्यामुळे त्याना नियमानुसार मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार होता. त्यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिल्याची चर्चा होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हा राजीनामा शुक्रवारी रात्री स्वीकारला आहे. त्यामुळे आता ते त्यांच्या मंत्रिपदाच्या उत्तरदायित्वातून मोकळे झालेले आहेत.
Comments are closed.