गडकरी उवाच! खुर्चीवर बसलेला एक दिवस उठणारच
खुर्ची मिळाल्यावर शांततेने राहा, अंगात येऊ देऊ नका. खुर्चीवर बसलेला एक दिवस उठणारच आहे. त्याला उठावेच लागणार आहे. नाही उठला तर देव उठवून घेऊन जाईल, याला कोणी अपवाद नाही, असे खडे बोल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज भाजप स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुनावले.
राजकारणात कोणतेही पद तात्पुरते असते. हे तात्पुरते काम आहे. तुमची खुर्ची कधीही जाऊ शकते. तुमच्यासोबतचे पोलीसही तुम्हाला कधीही सोडून जाऊ शकतात, अशा शब्दांत गडकरी यांनी सत्तेची हवा डोक्यात जाऊ देऊ नका, असा सल्ला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिला. कार्यकर्ते आणि नेत्यांच्या पिढय़ा बदलत राहतात आणि नेतृत्वही बदलले पाहिजे. याचा अर्थ नेत्याच्या पोटातून नेता जन्माला आला पाहिजे असे नाही, तर कार्यकर्त्यांमधून नेतृत्व विकसित झाले पाहिजे, असे गडकरी म्हणाले.
Comments are closed.