संगमेश्वरमध्ये अनोखी सामूहिक नांगरणी स्पर्धा; थरारक स्पर्धेत आराध्य किंजळकर, संदीप सुतार यांच्या जोडीने मारली बाजी

संगमेश्वर तालुक्यातील आंबवपोंक्षे येथे सामूहिक नांगरणी स्पर्धेचा थरार शुक्रवारी रंगला होता. ही अनोखी स्पर्धा पाहायला प्रंचड गर्दी झाली होती. लाल मातीतील या स्पर्धेपूर्वी एकाचवेळी अनेक बैलजोड्या दाखल झाल्या होत्या. त्यांनी प्रथम नांगरणी केली आणि त्यानंतर या स्पर्धेचा थरार रंगला होता. चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी या स्पर्धेला भेट देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.
सामूहिक नांगरणी व भातलावणी कार्यक्रमाचा आरंभ संगमेश्वर- चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आला. तालुक्यातील 2011 ला तालुक्यातील सरंद येथे प्रथम सामूहिक भातलावणी आणि चिखल स्पर्धेला सुरवात झाली. अकरा वर्षानंतर प्रथमच एकाच वेळी अनेक बैलजोड्या दाखल होत विक्रम झाला आहे. स्पर्धेचे नियोजन शेतकरी संघटना आंबव पोंक्ष ग्रामस्थ मंडळाने केले होते. शिट्टी वाजताच बैलजोड्या झेप घेऊन वेगात पळत होत्या. कमी वेळातअंतर कापण्यासाठी जोमाने दौडत होत्या आणि त्याच्या जोडीला सुरेख समालोचन आणि प्रेक्षकांची तेवढीच दाद देखील मिळत होती.
विजेत्यांना चषक व रोख बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. सामूहिक चिखलणी झाल्यावर झालेल्या स्पर्थेत घाटी जोड्यांमध्ये आराध्या किंजळकर (बुरंबाड), संजय वामन सावंत (पाली), सुजल संदीप पिलणकर(आरवली), राहुल बोल्ये (आंबव), संदीप बाळू सुतार (आंबव), देवजी भायजे (आंबव), श्री मानोबा (माखजन) यांनी बाजी मारली. तर
गौती गट म्हणजे संदीप सूटर (अंबव), सनबव सुटर (अंबू), संजय कटोकरी (मारलेश्वर), भैरी चंदिका (शिरवाली), गणेश सुनील येलोन (टेरल), मोन्या देसाई (तेर) (पाटवाली).
Comments are closed.