IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी सामन्यांसाठी दोन दिग्गजांच्या हस्ते 'अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी'चे अनावरण!
भारत आणि इंग्लंड दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका 20 जून रोजी खेळली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले मध्ये खेळला जाणार आहे. तसेच क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित प्रतिस्पर्धांपैकी एका स्पर्धेला आता ऐतिहासिक नवीन ओळख मिळाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) यांनी संयुक्तपणे अॅन्डरसन–तेंडुलकर ट्रॉफीच्या शुभारंभाची घोषणा केली आहे. ही प्रतिष्ठेची ट्रॉफी आता भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या प्रत्येक कसोटी मालिकेच्या विजेत्याला देण्यात येईल.
5 कसोटी सामन्यांची ही मालिका शुक्रवारपासून हेडिंग्ले येथे सुरू होणार असून, अॅन्डरसन–तेंडुलकर नावाने खेळली जाणारी ही पहिलीच मालिका असेल. ही ट्रॉफी कसोटी क्रिकेटमधील दोन महान दिग्गज खेळाडूंना सन्मानित करण्यात आली आहे. जेम्स अॅन्डरसन, ज्यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत आणि सचिन तेंडुलकर ज्यांनी कसोटीत सर्वाधिक धावा केल्या आहेत.
आता ह्या दोन्ही ट्रॉफी एकत्र केल्या असल्या, तरी पाटौदी कुटुंबाची परंपरा सुरूच राहणार आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यातील प्रत्येक कसोटी मालिकेनंतर विजेत्या कर्णधाराला ‘पाटौदी मेडल’ दिलं जाणार आहे.
अॅन्डरसन आणि तेंडुलकर यांचे कोरलेले फोटो आणि त्यांच्याच स्वाक्षऱ्या असलेली ही नवीन ट्रॉफी, आधुनिक कसोटी क्रिकेटमध्ये त्यांचे खेळगुण, दीर्घ कारकीर्द आणि खेळातील खेळभावना यांचा सन्मान करणारी आहे.
ECB (इंग्लंड क्रिकेट बोर्ड) आणि BCCI (भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ) यांनी अँडरसन–तेंडुलकर ट्रॉफी ही “परस्पर आदर, उत्तम कामगिरी आणि क्रिकेटच्या इतिहासाचा सन्मान करण्यासाठी” सुरू केल्याचं सांगितलं आहे.
Comments are closed.