आयस्क्रिम टेस्टर, गळाभेट ते सोशल साथी, जगातल्या 8 अनोख्या नोकऱ्या, जिथे काहीच न करता तगडा पगार!
अद्वितीय नोकरीच्या बातम्या: जगात असे लाखो लोक आहेत जे फक्त दोन वेळचे जेवण मिळवण्यासाठी दररोज कठोर परिश्रम करतात. ऊन, वारा असो की, पाऊस, हिवाळा असो किंव उन्हाळा असो. पण काही नोकऱ्या अशा असतात ज्यात तुम्हाला कठोर परिश्रम न करता आराम केल्यामुळं जास्त कमाई होते. जगात काही नोकऱ्या अशा आहेत, जिथं तुम्हाला आराम करण्याचा पैसा मिळतो. तुम्हाला हे एकूण आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. काही लोकांना गळाभेट घेण्यासाठीचा, झोपण्यासाठी किंवा कोणासोबत वेळ घालवण्यासाठीचे पैसे मिळतात. अशाच काही कमी कष्टाच्या नोकऱ्यांबद्दल माहिती जाणून घेऊयात.
1. गळाभेट घेण्याचे काम
ऑस्ट्रेलियातील मिसी रॉबिन्सन ही व्यवसायाने एक कडल थेरपिस्ट आहे. ती मानसिक तणावात असलेल्या लोकांची गळाभेट घेऊन सांत्वन देण्याचे काम करते. त्या बदल्यात प्रति रात्री दीड लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारते. हे काम जितके सोपे वाटते तितकेच ते भावनिकदृष्ट्या संवेदनशील आहे.
2. फक्त वेळ घालवण्यासाठी मिळतात पैसे
जपानमधील एक माणूस “सामाजिक साथीदार” म्हणून स्वतःला भाड्याने देतो. लोक त्याला फक्त वेळ घालवण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी किंवा त्यांच्यासोबत शांत वेळ घालवण्यासाठी कामावर ठेवतात. त्यासाठी तो चांगली रक्कम घेतो. त्याला कोणतेही काम करावे लागत नाही, त्याला फक्त सोबत वेळ घालवावा लागतो.
3. झोपणे आणि टीव्ही पाहणे
“क्राफ्टेड बेड्स” ही एक ब्रिटिश लक्झरी बेड कंपनी आहे. ही कंपनी लोकांना त्यांच्या बेडची गुणवत्ता तपासण्यासाठी दिवसातून काही तास झोपण्यासाठी आणि टीव्ही पाहण्यासाठी कामावर ठेवते. त्या बदल्यात कंपनी त्यांना चांगला पगार देते.
4. ग्रंथपालाची नोकरी
जर तुम्हाला शांत वातावरणात काम करायला आवडत असेल तर ग्रंथपाल बनणे हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये पुस्तकांची मांडणी पाहावी लागेल. सुरुवातीचा पगार 20000 ते 30000 रुपये असू शकतो आणि अनुभवासोबत तो वाढत जातो.
5. व्हॉइस आर्टिस्ट
चांगला आवाज असलेले लोक व्हॉइस ओव्हर कलाकार बनू शकतात. जाहिराती, टीव्ही शो, व्हिडिओ गेम आणि चित्रपटांमध्ये काम करू शकतात. यामध्ये काम कमी आणि कमाई जास्त असते.
6. टेप ऑपरेटर
हे काम खूप सोपे मानले जाते. यामध्ये तुम्हाला फक्त टेप सर्व्हरमध्ये प्लग करायचा आहे आणि फाइल्स अपलोड करायच्या आहेत. यासाठी कंपन्या प्रति तास 2500 ते 2800 रुपये देतात.
7. आईस्क्रीम टेस्टर
हे काम जितके वाटते तितकेच मनोरंजक आहे. आईस्क्रीम चाखणाऱ्याला वेगवेगळ्या चवी चाखून त्यांची गुणवत्ता तपासावी लागते. या व्यवसायात दरवर्षी 28 लाख ते 78 लाख रुपये पगार मिळू शकतो.
8. फूड स्टायलिस्ट
टीव्हीवर आणि जाहिरातींमध्ये दिसणारे चविष्ट पदार्थ हे फूड स्टायलिस्टच्या कठोर परिश्रमाचे फलित आहे. त्यांचे काम अन्न आकर्षक बनवणे आहे जेणेकरून ग्राहक त्याकडे आकर्षित होतील. या व्यवसायातही दरवर्षी 19 लाख ते 75 लाख रुपये कमाई करता येते.
या सर्व नोकऱ्यांबद्दल खास गोष्ट म्हणजे त्या पारंपारिक म्हणजे सकाळी 9 ते सांयकाळी 5 वाजेपर्यंतच्या नोकऱ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत. जर तुमच्यात काहीतरी वेगळे विचार करण्याची किंवा वेगळं काही करण्याची आवड असेल, तर हे पर्याय तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी ठरु शकतात.
महत्वाच्या बातम्या:
तरुणांना नोकरीची मोठी संधी! विविध पदासांठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
अधिक पाहा..
Comments are closed.