पंढरपूरमध्ये पाणीपुरी खाताना तरुणीच्या तोंडावर अज्ञाताने फेकला ज्वलनशील पदार्थ, डॉक्टरांनी एक ड
पंढरपूर : पंढरपुरात तरुणीवर झालेल्या ॲसिड हल्ल्यानंतर पोलिसांचा तपास अद्यापही सुरू आहे. काल सायंकाळी ही तरुणी पंढरपूर नगरपालिकेच्या समोर असलेल्या गाड्यावर पाणीपुरी खायला (Pandharpur Crime News) गेली होती. पाणीपुरी गाड्यावर खात असताना अचानक दुचाकी वर आलेल्या अज्ञातांनी तिच्या चेहऱ्यावर ॲसिड (Pandharpur Crime News) सदृश्य पदार्थ फेकल्याने ती खाली कोसळली. यानंतर घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक विक्रम शिरसाठ यांनी तिला तातडीने लाईफ लाईन या खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू झाल्याने या तरुणीचे आयुष्य आणि डोळे वाचवण्यात सध्या तरी डॉक्टरांना यश आल्याची माहिती आहे. (Pandharpur Crime News)
Pandharpur Crime News: सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेण्याचे आव्हान
या घटनेचा तपास पोलिस करत आहेत. कुठले धागेद्वारे पोलिसांना मिळाले का ? की पोलीस तपासच करत आहेत याबाबत मात्र कमालीची गुप्तता पाळली जात आहे. सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे पोलिसांची तपास चक्र फिरत आहेत. मात्र रविवारी रात्री ही घटना घडली त्यावेळी घटनास्थळाच्या आसपासचे दुकाने बंद होते. काही प्रमाणात अंधार होता. त्यामुळे तेथील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे. त्या दृष्टीने पोलिसांची यंत्रणा काम करत आहे. सद्यस्थितीला ॲसिड हल्ला झालेल्या तरुणीवर उपचार सुरू असून तिच्या डोळ्यातील ॲसिड काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. तर चेहरा व इतर भागावर पडलेल्या ॲसिडचे कुठल्याही प्रकारे खोलवर दुष्परिणाम होऊ नये. यासाठी डॉक्टर अधिकचे उपचार करत आहेत.(Pandharpur Crime News)
Pandharpur Crime News: डॉक्टरांनी दिली माहिती
डॉक्टरांनी याबाबत माहिती देताना म्हटलं की, पेशंटला तातडीने रूग्णालयात दाखल केल्यामुळे लवकरात लवकर उपचार करता आले, डोळ्यांना काही होऊ नये यासाठी आधी उपचार देऊन तपासणी केली. त्यामुळे पुढचं डोळ्याचं जळणं वाचवू शकलो. तर पेशंटचे १० ते १५ टक्के शरीरावर काही जखमा झाल्या आहेत. तर पेशंटचे डोळे आल्या आल्या धुतले त्यामुळे एक डोळा वाचला असून दुसऱ्या डोळ्यावर उपचार सुरू आहे, पेशंटला येणार आंधळेपणा आपण घालवू शकलो आहोत असंही त्यांनी सांगितलं आहे.
Pandharpur Crime News: नेमकं काय घडलं?
पंढरपूर शहरातील मध्यवर्ती भागामध्ये एका तरुणीच्या चेहऱ्यावर ॲसिड हल्ला झाला. या हल्ल्यात त्या तरुणीचा चेहरा विद्रुप झाला असून, तिला कायमचे अंधत्व येण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली होती. मात्र उपचारादरम्यान तरूणीचा डोळा सुखरूप असल्याचे समोर आले आहे, ही घटना रविवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास पंढरपूर नगरपरिषदेच्या जवळ घडली. हल्ला झालेली तरुणी पाणीपुरी खाण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेजवळ भेळीच्या गाड्यावर गेली होती. यादरम्यान कोणीतरी येऊन तिच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकले. यामुळे या तरुणीच्या चेहऱ्याला इजा झाली. तरुणीच्या डोळ्यांमध्ये ॲसिड गेल्याने तिच्या डोळ्यांना दिसणे बंद झाले.
ही घटना समजताच माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी तिला तत्काळ उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी मुलीच्या डोळ्यातील ॲसिड काढले. परंतु तिच्या चेहऱ्यावर किती टक्के इजा झाली ते उद्याच समजेल असे डॉ. मंजुषा देशमुख यांनी सांगितले. ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी रुग्णालयात संबंधित मुलीच्या आई व वडिलांची भेट घेतली. मुलीवर हल्ला झालेल्या ठिकाणचे सीसीटीव्हीचे चित्रीकरण पाहून नेमकी घटना कशी घडली, ॲसिड टाकणारे कोण आहेत, याचा शोध पोलिस घेत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.