मैदानात जल्लोषाऐवजी सन्नाटा, संघाला विजय मिळवून दिला अन्… गोलंदाजाने स्वत:चा जीव गमावला, अखेर


क्रिकेटने नेहमीच चाहत्यांना जल्लोष करण्याची अनेक कारणं दिली आहेत. खेळाडूंनी नेहमी विक्रमी खेळी करून किंवा गोलंदाजी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अगदी ब्रायन लारा सारख्या महान फलंदाजाने तर कसोटी क्रिकेटमध्ये 400 धावा केल्या आहेत. पण हाच खेळ कधी कधी दु:खद क्षणही देऊन जातो. चौकार-षटकारांचा वर्षाव पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी अनेकदा मैदानावर खेळाडूंना दुखापत होताना पाहिलं आहे. काहींना तर अशा गंभीर दुखापती झाल्या की त्यांनी आपला जीव गमावला आहे.

कोणाची गेली प्राणज्योत, तर कोण थोडक्यात वाचला…

ऑस्ट्रेलियाचा फिलिप ह्यूज, भारताचा रमन लांबा आणि पाकिस्तानचा वसीम राजा हे त्या दुर्दैवी खेळाडूंच्या यादीत आहेत, ज्यांनी मैदानावरच आपले प्राण गमावले. या सर्वांना खेळादरम्यान झालेल्या दुखापतींमुळे मृत्यू आला. काही वर्षांपूर्वी फुटबॉल विश्वातही अशीच एक घटना घडली होती, डेन्मार्कचा स्टार खेळाडू क्रिश्चियन एरिक्सनला सामन्यादरम्यान हृदयविकाराचा झटका आला. मात्र, वेळीच उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला आणि तो पुन्हा मैदानावर परतला. दुर्दैवाने, प्रत्येकाची कहाणी एरिक्सनसारखी नसते.

संघाला विजय मिळवून दिला, पण स्वतःचा जीव गमावला…

अलीकडेच, अशाच एका स्थानिक क्रिकेट सामन्यात विजयानंतर शोक पसरला. एका रोमांचक सामन्यात गोलंदाजाने अखेरच्या षटकात आपल्या संघाला विजय मिळवून दिला, पण काही क्षणांतच त्याने जीव गमावला. ही बातमी समोर येताच संपूर्ण क्रिकेटविश्व स्तब्ध झाले. चाहत्यांना विश्वास बसत नव्हता की, आपल्या संघासाठी विजय मिळवून देणारा खेळाडू काही क्षणांतच कायमचा निघून गेला.

शेवटच्या षटकानंतर मैदानात काय घडलं?

मुरादाबादमध्ये झालेल्या एका स्थानिक सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला शेवटच्या 4 चेंडूंवर 14 धावांची गरज होती. गोलंदाजीसाठी अहमर खान आला होता आणि संघाला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. त्याने या षटकात जबरदस्त गोलंदाजी करत संघाला 11 धावांनी विजय मिळवून दिला. पण शेवटचा चेंडू टाकल्यानंतर अचानक तो मैदानावर कोसळला. तत्काळ सहकाऱ्यांनी डॉक्टरांना बोलावलं, सीपीआर दिला आणि त्याला रुग्णालयात नेलं. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली.

हे ही वाचा –

एक-दोन-तीन… पोरीने कानाखाली मारल्या, Ind vs WI च्या लाईव्ह सामन्यात मैदानात काय घडलं?, VIDEO

आणखी वाचा

Comments are closed.