‘पप्पा अन् आत्याने आईला खूप मारलं’, चार वर्षांच्या चिमुकल्याने रडत सांगितली आपबिती, सासरच्या छळ
झांसी: झांसीमध्ये घरगुती वादातून २५ वर्षीय मोनिका या महिलेने टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पती आणि नणंद यांनी मारहाण (Up Crime News) केल्यानंतर मोनिकाने विष प्राशन केल्याचं तिच्या चिमुरड्या मुलाकडून सांगण्यात आलं आहे. या प्रकरणात मोनिकाच्या चार वर्षांच्या मुलाने तिला मारहाण झाल्याची माहिती दिली आहे. माहेरच्या मंडळींनी पोलिसांच्या मदतीने मोनिकावर सुरू असलेला अंत्यसंस्कार (Up Crime News) थांबवला असून, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.(Up Crime News)
Crime News: खर्च आणि मुलाच्या शाळेच्या फीवरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद
शहर कोतवाली हद्दीतील नगरिया कुआं परिसरात राहणाऱ्या मोनिकाचा विवाह २०२० मध्ये शिवम दुबे याच्याशी झाला होता. ती चार वर्षांचा मुलगा ओम याच्यासह (Up Crime News) सासरी राहत होती. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, खर्च आणि मुलाच्या शाळेच्या फीवरून पती-पत्नीमध्ये वारंवार (Up Crime News) वाद होत होते. मृत मोनिकाची वहिनी कोमल पांडे हिने सांगितले की, शिवम गेल्या दोन महिन्यांपासून बेंगळुरूमध्ये होता आणि तीन दिवसांपूर्वीच तो घरी परतला होता. मंगळवारी रात्री पैशांच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता.(Up Crime News)
Crime News: व्हिडीओ कॉलदरम्यान तिने मोनिकाला नणंदेने ढकलून…
बुधवारी सकाळी पुन्हा वाद उफाळून आला. कोमलने सांगितले की, व्हिडीओ कॉलदरम्यान तिने मोनिकाला नणंदेने ढकलून पाडल्याचे पाहिले. त्यानंतर पती, सासू आणि नणंद यांनी मोनिकाला मारहाण केली. फोनवरून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता कॉल कट करण्यात आला. काही वेळाने शिवमने फोन करून मोनिकाने विष प्राशन केल्याची माहिती दिली, मात्र तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले नाही.(Up Crime News)
दुपारी सुमारे चारच्या सुमारास प्रकृती गंभीर झाल्यानंतर मोनिकाला मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी माहेरचे नातेवाईक पोहोचले असता, मृतदेह घराबाहेर ठेवून अंत्यसंस्काराची तयारी सुरू असल्याचे दिसून आले. त्यांनी विरोध केल्यानंतर पोलिसांनी अंत्यसंस्कार थांबवले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.(Up Crime News)
या प्रकरणात मोनिकाच्या चार वर्षांच्या मुलाने ओमनेही “पप्पा आणि आत्याने आईला खूप मारलं” असे रडत सांगितले. त्याने भांडणाचे फोटो काढल्याचाही दावा करण्यात आला आहे. शहर कोतवालीचे प्रभारी विद्यासागर यांनी सांगितले की, नातेवाईकांकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. सध्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.(Up Crime News)
आणखी वाचा
Comments are closed.