डॉक्टर होण्यासाठी कायपण! अपंग कोट्यातून MBBS करण्यासाठी सूरजनं स्वतःचा पाय कापला
जौनपूर बातम्या : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) जौनपूरमध्ये (Jaunpur) एका विद्यार्थ्याने दिव्यांग कोट्यातून एमबीबीएसमध्ये (MBBS) प्रवेश मिळवण्यासाठी अगदी टोकाचं पाऊल उचललं आहे. यात 24 वर्षीय सूरज भास्करने (Suraj Bhaskar) पीडब्ल्यूडी (दिव्यांग) कोट्यातून पात्र ठरण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या पायाचा काही भाग कापल्याचे सांगितले जात आहे. दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पोलीस अहवाल अनिवार्य असतो. त्यामुळे सूरजने अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून आपला पाय कापल्याचा दावा करत तक्रार दाखल केलीहे. फक्त तपास सुरू झाल्यावर या प्रकरणाला एक धक्कादायक वळण लागले, ज्यात फसवणुकीची एक धक्कादायक कहाणी समोर आली आहे. (जौनपूर व्हायरल न्यूज)
Suraj Bhaskar : तीन वर्षांपासून एमबीबीएसची तयारी, अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून पाय कापल्याचा दावा
एका इंग्लिशच्या वृत्तानुसार, सूरजकडे डी-फार्माची पदवी आहे आणि तो गेल्या तीन वर्षांपासून एमबीबीएसची तयारी करत होता. 18 जानेवारीच्या रात्री तो त्याच्या बांधकाम सुरू असलेल्या घरात एकटाच झोपला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा डावा पाय कापलेल्या अवस्थेत आढळला. सुरुवातीला सूरजने अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून आपला पाय कापल्याचा दावा करत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून या कथित हल्ल्याचा तपास सुरू केला. परंतु, त्याच्या जबाबांमधील विसंगतीमुळे पोलिसांना संशय आला. तपासादरम्यान, अधिकाऱ्यांनी त्याचे कॉल रेकॉर्ड तपासले आणि त्याच्या मैत्रिणीला चौकशीसाठी बोलावले. तेव्हाच हे प्रकरण उघडकीस येऊ लागले.
Jaunpur News : अप्रामाणिक मार्गांनी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न फसला
पोलिसांच्या सूत्रांनुसार, तिने सांगितले की, या घटनेपूर्वीही सूरज अप्रामाणिक मार्गांनी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न करत होता. तपासकर्त्यांनानंतर भूल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुया आणि शस्त्रक्रियेची उपकरणे सापडली, ज्यांचा वापर स्वतःचा पाय कापण्यासाठी करण्यात आला होता. एका क्रूर हल्ल्याचे प्रकरण म्हणून सुरू झालेली ही घटना, नंतर स्वतःला इजा पोहोचवणे आणि खोटा बनाव रचण्याचे प्रकरण ठरले असून या घटनेनं देशभरात खळबळ उडाली आहे.
सूरजवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. सुरजचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न होतं, त्याने त्यासाठी मोठी किंमतहे मोजली फक्त चुकीच्या कृत्याचं शेवट फक्त एका चुकीच्या परिणामांकडे घेऊन गेल्याचे या प्रकरणातून पुढे आले आहे. या प्रकरणी पोलीस आता नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.