नाचता-नाचता वरात पुढे चालली, नवरदेव उलटी आली म्हणून रस्त्याच्या कडेला गेला अन् घात झाला…दोन्ह


अपघाताच्या बातम्या : उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात झालेल्या एका दुःखद घटनेने लग्नघरी असलेल्या आंनदावरती क्षणात विरजण पडलं. लग्न समारंभाच्या काही वेळ आधी झालेल्या अपघातात (Accident News) वराचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामुळे घटनास्थळी गोंधळ उडाला. पोलिसांनी वराचा मृतदेह (Accident News) ताब्यात घेतला आहे आणि तपास सुरू केला आहे. अपघातस्थळावरून पळून गेलेल्या ट्रक चालकाचाही शोध सुरू आहे. या मिळालेल्या वृत्तानुसार, रविवारी रात्री बिनौली येथील रहिवासी सुबोध (२५) याला सरुरपूर कलन गावात लग्न समारंभाच्या आधी ट्रकने धडक दिली आणि या घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात झाला तेव्हा तो दिल्ली-सहारापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला उभा होता आणि उलट्या करत होता. त्याला धडक दिल्यानंतर चालक ट्रक घेऊन पळून गेला.(Accident News)

Accident News :  रस्त्याच्या कडेला उभा राहून तो उलट्या करू लागला

बिनौली गावातील फिजिओथेरपिस्ट सुबोधची लग्नाची मिरवणूक रविवारी सरूरपूर कलान गावात आली. लग्नाच्या स्वागत समारंभ आणि नाश्त्यानंतर पुढील विधी होणार होते. पण विवाहस्थळी पोहचण्याआधी सुबोधला अस्वस्थ वाटू लागले आणि रस्त्याच्या कडेला उभा राहून तो उलट्या करू लागला. दिल्लीहून येणाऱ्या एका ट्रकने सुबोधला जोरदार धडक दिली. धडकेमुळे सुबोध जमिनीवर पडला. लग्नाच्या वेळी त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्याचवेळी त्याचा मृत्यू झाला.

Accident News : अनेकांना सुबोधच्या मृत्यूची माहिती नव्हती

लग्नाच्या वरातीत पाहुणे मंडळी, मित्र परिवार आनंदाने नाचत राहिले. सुबोधच्या लग्नाची तयारी सुरू होती आणि लग्नाची पार्टीही सुरू होती. वधूच्या घरीही आनंदोत्सव साजरा होत होता. या दुर्घटनेची बातमी पसरताच दोन्ही घरांवर शोककळा पसरली. रुग्णालयात आलेल्या अनेक लग्नाच्या पाहुण्यांनी सांगितले की अनेकांना सुबोधच्या मृत्यूची माहिती नव्हती आणि ते सर्वजण लग्नाचा आनंद साजरा करत होते. ज्यांना सुरुवातीला मृत्यूबद्दल सांगण्यात आले त्यांना विश्वास बसला नाही. माहिती मिळताच पोलिसांनी घटनेचा तपास केला. तपास अधिकारी दीक्षित त्यागी यांच्या मते, धडक देणारा ट्रक शोधण्यासाठी आणि त्याला पकडण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

Accident News : भरधाव वेगात आलेल्या ट्रकने सुबोधला चिरडले

या अपघातातबाबत नवरदेवाच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, सुबोधला मळमळत असल्याने तो रस्त्याच्या कडेला गेला. उलट्या होऊ लागल्याने तो गाडीजवळ उभा असतानाच विरुद्ध दिशेने भरधाव वेगात आलेल्या ट्रकने सुबोधला चिरडले. त्यानंतर ट्रकने त्याला काही मीटर अंतरापर्यंत फरफटत ओढून नेले. पुढे ट्रक चालक त्याला तसाच टाकून पळून गेला. पाहुण्यांनी त्याला तातडीने एका खाजगी रुग्णालयात नेले आणि नंतर त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

आणखी वाचा

Comments are closed.