रात्री भांडण झालं; तीन चिमुरड्यांना घेऊन निघाली, सकाळी शोधाशोध, वाहत्या कॅनलच्या कडेला लेकरांचे
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या पतीशी झालेल्या भांडणानंतर तिच्या तीन मुलांसह कालव्यात उडी मारली, यामध्ये आईसह तीन चिमुरड्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काल (शनिवारी, ता 9) रिसौरा गावात घडली. मृतांची ओळख रीना आणि तिची तीन मुले हिमांशू (9), अंशी (5) आणि प्रिन्स (3) अशी झाली आहे.
घरगुती कारणावरून भांडण झाले होते. वृत्तानुसार, शुक्रवारी रात्री रीनाचे पती अखिलेशशी घरगुती कारणावरून भांडण झाले होते. त्यानंतर ती पतीला न सांगता मुलांसह घराबाहेर पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा घरात बायको आपल्या मुलांसह बेपत्ता झाल्याचे लक्षात आले तेव्हा तिच्या सासरच्यांनी त्यांचा शोध सुरू केला. कालव्याजवळ मुलांचे कपडे, महिलेल्या बांगड्या, चप्पल आणि इतर सामान सापडल्यानंतर शोधकार्य सुरू झालं. त्यांनी ताबडतोब पोलिसांना कळवलं. बेपत्ता झालेल्या महिलेने मुलांसह कालव्यात उडी मारली असावी असा संशय असल्याने पोलिसांनी कालव्यात शोध सुरू केला. अखेर त्यांचे मृतदेह कालव्यात सापडले. मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
बांदा येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक शिव राज म्हणाले, ” घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही कालव्याची पाण्याची पातळी कमी केली आणि पाण्यात शोधकार्य सुरू केलं. काही तासांनंतर, महिलेचे आणि तिच्या तीन मुलांचे मृतदेह सापडले. त्यांचे मृतदेह कापडाने बांधलेले होते. रात्री पतीशी भांडण झाल्यानंतर ती महिला घरातून निघून आली, त्यानंतर तिने आपल्या मुलांसह जीव दिला”, या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.पोलिसांनी महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
नेमकं काय घडलं?
शुक्रवारी रात्री रक्षाबंधनावरून तिचे पतीशी भांडण झाले. त्यानंतर ती तिच्या तीन मुलांसह घराबाहेर पडली. तिने तिन्ही मुलांना कमरेला साडी बांधली आणि घरापासून १ किलोमीटर अंतरावर कालव्यात उडी मारली. त्यामुळे चौघांचाही मृत्यू झाला. सकाळी पती उठला तेव्हा त्याला त्याची पत्नी आणि मुले घरी आढळली नाहीत. त्याने गावात त्यांचा शोध घेतला, पण ते कुठेही सापडले नाहीत. महिलेच्या बांगड्या आणि मुलांचे चप्पल गावातील कालव्याजवळ पडले होते. यानंतर, कालव्यात त्यांचा शोध घेण्यात आला. शनिवारी सकाळी कालव्यातून चौघांचे मृतदेह सापडले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. हे प्रकरण बांदा कोतवाली येथील रिसौरा गावातील आहे.
अखिलेश त्याची पत्नी रीना देवी आणि तीन मुले हिमांशू, प्रिन्स आणि अंशी यांच्यासह रिसौरा गावात राहत होता. अखिलेशच्या धाकट्या भावाचे कुटुंबही त्यांच्यासोबत राहते. शुक्रवारी रात्री अखिलेश दारू पिऊन रात्री उशिरा घरी आला. रीना देवी त्याला म्हणाली की उद्या रक्षाबंधन आहे आणि तू इतक्या रात्री दारू पिऊन आला आहेस. यावरून पतीने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे त्रस्त होऊन ती महिला तिच्या मुलांसह घराबाहेर पडली. त्यावेळी पती झोपला होता. रात्री तिने घरापासून 1 किमी अंतरावर असलेल्या कालव्यात उडी मारली.
आणखी वाचा
Comments are closed.