UPI, नेट बँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी अपडेट,1 एप्रिलपासून पेमेंट सुरक्षा भक्कम, काय बदलणार?
UPI नवीन नियम एप्रिल 2026 नवी दिल्ली : 1 एप्रिलपासून डिजीटल पेमेंट पद्धतीत बदल होणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून त्या संदर्भातील तयारी करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार आता यूपीआय, नेट बँकिंग किंवा मोबाइल वॉलेटवरुन व्यवहार करताना केवळ एक पिन किंवा एक पासवर्ड पुरेसा असणार नाही. प्रत्येक पेमेंटसाठी दोन टप्प्यात ऑथेंटिकेशन करावं लागेल. यामुळं ऑनलाईन पेमेंट पहिल्यापेक्षा अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह होतील. ऑनलाईन फसवणुकीची प्रकरणं रोखण्यात यामुळं मदत होईल.
आता यूपीआय किंवा नेट बँकिंगचा वापर करणारे यूजर्स सध्या एक पिन अनेकदा वापरतात. यामुळं हॅकर्सला ट्रॅक करणं सोपं होतं. मात्र, आता बँका आणि फिनटेक कंपन्यांना दोन प्रकारे सुरक्षा द्यावी लागेल.
प्रत्येक व्यवहारावेळी बदलला जाणारा डायनामिक पर्याय असेल. म्हणजेच प्रत्येक व्यवहारावर नवा ओटीपी जनरेट होईल. ग्राहक त्यांच्या सोयीनुसार ओटीपी + पिन किंवा बायोमेट्रिक सोबत डिव्हाइस लिंक करणे किंवा टोकन आधारित पडताळणी या सारखे पर्याय निवडू शकतात. ज्यामुळं ऑनलाईन पेमेंट सुरक्षित होईल.
आरबीआय लागू करत असलेल्या नव्या पद्धतीचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना मिळेल. ऑनलाईन फसवणूक किंवा फिशिंग हल्ल्यांच्या प्रकरणांना रोखता येईल. तुमचा पासवर्ड चुकीच्या व्यक्ती हाती लागला तरी तुमच्याकडे आलेला ओटीपी आणि फिंगरप्रिंटशिवाय तो व्यक्ती पैसे काढू शकणार आहे. ही सुरक्षा व्यवस्था विदेशी व्यवहारांवर देखील लागू असेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर ही पद्धत 1 ऑक्टोबरपासून लागू होईल.
दरम्यान, 1 एप्रिलपासून अनेक नियम बदलणार आहेत. एटीएममधून पैसे काढण्यासाठीचे नियम बदलणार आहेत. तर, 1 एप्रिलपासून नव्या आयकर कायद्याची अंमलबजावणी केली जाते.
आणखी वाचा
Comments are closed.