IND vs NZ: आयुष बदोनीच्या निवडीवर माजी दिग्गज भडकला, प्रशिक्षक गंभीरसहित मुख्य निवडकर्त्यांवर ओढले ताशेरे!
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील वनडे मालिकेच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी दिल्लीच्या आयुष बदोनीचा (Ayush badoni) भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, या निवडीमुळे नव्या वादाला तोंड फुटले असून माजी क्रिकेटपटूंनी निवड समितीवर ताशेरे ओढले आहेत.
1983 च्या विश्वचषक विजेत्या संघातील सदस्य के. श्रीकांत (Krushnamachari Shrikant on Gautam Gambhir & Ajit Agarkar) यांनी निवड समितीचे अध्यक्ष अजित अगरकर आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. श्रीकांत म्हणाले, अशा सुमार कामगिरीनंतर त्याची निवड होण्याची शक्यताच नव्हती. काही खेळाडूंना संघात येण्यासाठी खूप धावा कराव्या लागतात, तर काहींना काहीही न करता संघात स्थान मिळते. त्याच्या बॅटमधून आलेली एखादी तरी महत्त्वाची खेळी कोणाला आठवतेय का?
श्रीकांत यांनी गौतम गंभीरवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधताना म्हटले की, बदोनी आयपीएलमध्ये ‘एलएसजी’ (LSG) कडून खेळला आहे आणि तिथे त्याचे कोणीतरी मार्गदर्शक (मेंटर) होते, म्हणूनच आज तो संघात आहे. गौतम गंभीर 2022 आणि 2023 मध्ये लखनौ सुपर जायंट्सचा मेंटर होता.
बदोनीचा अलीकडचा फॉर्म खराब असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. दिल्लीसाठी खेळताना शेवटच्या 3 डावात त्याने केवळ 16 धावा केल्या. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्याने गोलंदाजीत केवळ 4 विकेट्स घेतल्या आहेत रेल्वेविरुद्ध 3 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.
प्रथम श्रेणी 21 सामन्यांत 1681 धावा आणि 22 विकेट्स त्याने घेतल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये 27 सामन्यांत 693 धावा आणि 18 विकेट्स घेतल्या आहेत त्याचबरोबर टी-20 क्रिकेटमध्ये 96 सामन्यांत 1788 धावा आणि 17 विकेट्स घेण्याची कामगिरी त्याने केलेली आहे.
Comments are closed.