श्रेयस अय्यरने अचानक टीम इंडियाचं कर्णधारपद सोडलं, ‘या’ यष्टिरक्षक खेळाडूला मिळाली कमान!
भारत आणि ऑस्ट्रेलिया ए (IND A vs Australia A) संघांमध्ये वनडे मालिका चालू आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas iyer) होता, पण ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध दुसऱ्या सामन्यापूर्वी अय्यरने अचानक कर्णधारपद सोडलं. व्यवस्थापनाने अय्यरच्या कर्णधारपद सोडण्याबाबत काही माहिती दिलेली नाही. तसेच अय्यरने स्वतःदेखील याबाबत काही सांगितलेले नाही. तरीही, अय्यरने अचानक कर्णधारपद सोडण्यामागे वैयक्तिक कारण असू शकते, असे दिसते.
दुसऱ्या सामन्यापूर्वीच अय्यरने हा निर्णय घेतला आणि विकेटकीपर-फलंदाज ध्रुव जुरेलला (Dhruv jurel) नवीन कर्णधार बनवण्यात आले आहे. ध्रुव जुरेल आधीच
संघात उपकर्णधार होता. रिपोर्टनुसार, अय्यरने अचानकच ब्रेक घेतला आणि तो मुंबईकडे निघून गेला. जाण्यापूर्वी त्याने निवड समितीला ही माहिती दिली आणि 4 दिवस सामना खेळू शकणार नाही, असे सांगितले.
आशिया कप 2025 (Asia Cup 2025) नंतर भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. निवड समिती या मालिकेत श्रेयस अय्यरला मधल्या फळीत संधी देऊ शकते. अय्यर आशिया कपच्या संघात समाविष्ट नसल्यामुळे सोशल मीडियावरही बऱ्याच चर्चा सुरू आहेत. निवड समितीकडेही अय्यरला संघात न समाविष्ट केल्याबाबत प्रश्न विचारले गेले होते. मात्र मुख्य निवडकर्ते अजीत आगरकर (Ajit Agarkar) म्हणाले होते की, अय्यरला न निवडण्यामागे काही कारण नाही, पण सध्या काही करता येणार नाही, अय्यरला थोडं थांबावं लागेल. ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध मालिकेसाठी संघ जाहीर करताना अय्यरला संघाची कमान देण्यात आली होती.
Comments are closed.