अमेरिकेचे ‘आर्क’ डिलिव्हरी यान, अवघ्या एका तासात सामान घेऊन पृथ्वीवर पोहोचणार

अमेरिकेची एअरोस्पेस आणि डिफेन्स कंपनी ‘इनव्हर्जन’ने एक खास अंतराळ यान तयार केले. ‘आर्क’ असे यानाचे नाव असून त्याद्वारे पृथ्वीच्या कक्षेतून पृथ्वीच्या कोणत्याही भागात एका तासापेक्षा कमी वेळेत 227 किलोचे गरजेचे सामान पोहोचवता येईल.
‘इनव्हर्जन’चे सहसंस्थापक जस्टीन फियास्केटी आणि ऑस्टिन ब्रिग्स यांनी सांगितले की, हा एक नवीन लॉजिस्टीक प्लॅटफॉर्म आहे. अंतराळात एक नेटवर्क बनवून त्या आधारे पृथ्वीवर पोहोचणे आणखी सोपे झाले आहे. ‘आर्क’चा वेग ताशी 24,700 किमी आहे. स्पेसक्राफ्टच्या तुलनेत ‘आर्क’ लहान आहे. 8 फूट उंच, 4 फूट रुंदीचे हे डिलिव्हरी यान वैद्यकीय उपकरणे, औषधे, एवढेच नव्हे तर ड्रोनदेखील वाहून नेऊ शकते. त्याची रचनाही वैशिष्टय़पूर्ण आहे. अंतराळात पुन्हा प्रवेश करताना हे यान स्वतःला नियंत्रित करू शकतो.
- आर्क यान म्हणजे एक प्रकारचे डिलिव्हरी स्पेस व्हेईकल आहे. ते फक्त सामान वाहून नेऊ शकते. अंतराळवीरांना नेण्यासाठी हे यान नाही.
- स्पेसएक्स उपग्रम मोहिमेंतर्गत एका अंतराळयानाचे लाँचिंग, त्याला परत पाठवणे व अन्य खर्च असे मिळून साधारण 48 कोटी रुपये खर्च होतो. त्यातुलनेने आर्क यानाचा खर्च कमी आहे.
- ‘आर्क’ पूर्णपणे विकसित व्हावे यासाठी इनव्हर्जन कंपनीने युनिट तयार केले आहे. त्याच्या आतापर्यंत अनेक चाचण्या झालेल्या आहेत. एअरोडायनामिक मॉडेलिंगही पूर्ण झालेली आहे.
- पृथ्वीच्या कक्षेत ‘आर्क’ यान ठेवायचे असे कंपनीचे मिशन आहे. साधारण पाच वर्षे तरी ते अंतराळात पृथ्वीच्या कक्षेत राहील. तिथून एक तासापेक्षा अगदी कमी वेळेत सामान घेऊन पृथ्वीवर पोहोचू शकते किंवा अत्यावश्यक सामान घेऊन एका जागेवरून दुसऱया जागी जाऊ शकते.
Comments are closed.