अमेरिकेचा इराणच्या खर्ग बेटावर हल्ला, जग इंधन टंचाईच्या खाईत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकन सैन्याने शनिवारी इराणच्या खर्ग बेटावर हल्ला केला. हे बेट इराणचे प्रमुख तेल निर्मिती केंद्र आहे. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे अवघे जग इंधनटंचाईच्या खाईत लोटले जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

इराणने होर्मुझ सामुद्रधुनी मार्गातून होणारी टँकर जहाज वाहतूक बंद केल्यामुळे हिंदुस्थान, युरोपसह जगभरातील अनेक देशांमध्ये इंधनटंचाई निर्माण झाली आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी खुली न केल्यास तेल केंद्रावर हल्ला करण्याची धमकी अमेरिकेने दिली होती. खर्ग बेटावर 90 टक्क्यांहून अधिक कच्चे तेल जगभरात निर्यात होते.

Comments are closed.