टॉवेलमध्ये ट्रम्प यांचा मसाज! स्वीमिंग पुलात ‘क्लिंटन-लीला’!! स्टीफन हॉकिंग, मायकल जॅक्सनसह अनेक दिग्गजांचे फोटो; 7 सेटस्, 3 लाख दस्तावेज जारी

अख्ख्या जगात खळबळ उडवून देणाऱ्या एपस्टीन सेक्स स्कँडल प्रकरणातील लाखो दस्तावेज अमेरिकेच्या न्याय विभागाने भारतीय प्रमाण वेळेनुसार शनिवारी पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास जाहीर केले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पॉप सिंगर मायकल जॅक्सन, ब्रिटनचे प्रिन्स अँड्रय़ू, अब्जाधीश रिचर्ड ब्रेसनन, स्टीफन हॉकिंग यांच्यासह अनेक दिग्गजांची छायाचित्रे या दस्तावेजात आहेत. ट्रम्प आणि क्लिंटन यांची यापूर्वीही काही छायाचित्रे जाहीर करण्यात आली होती. यावेळी क्लिंटन आणि ट्रम्प यांच्या काही ‘लीला’ नव्या छायाचित्रातून उघड झाल्या आहेत. मात्र, निवडक दस्तावेज जारी करून न्याय विभाग स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करीत असून आम्हाला धोका दिला, असा आरोप पीडितांनी केला.

दोन दिवसांपूर्वी एपस्टीन प्रकरणातील 68 छायाचित्रे जारी करण्यात आली होती. त्यानंतर 19 तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, अमेरिकेच्या न्याय विभागाने बरीच उशिरा ही सर्व माहिती सार्वजनिक केली. यात बरीच माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यात राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्दे असल्याचे न्याय विभागाने म्हटले आहे. सुमारे 3 लाखांपेक्षा जास्त फोटो आणि इतर कागदपत्रांसह 3 जीबीपेक्षा जास्त क्षमतेच्या या सर्व फाईल्स आहेत. आतापर्यंत 1200 पेक्षा जास्त पीडितांची ओळख पटली आहे. मात्र, त्यांची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही.

अल्पवयीन असल्याचे पुरावे मागायचा एपस्टीन

नव्या फाईल्समधून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलींना एपस्टीन हा ओळखपत्र मागायचा. एका कागदपत्रातील उल्लेखानुसार, एपस्टीन या मुलींच्या वयाचा पुरावा मागायचा. या स्कँडलमध्ये 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच एपस्टीनच्या निशाण्यावर असायच्या.

न्याय विभागाने अन्याय केला – पीडितांचा आरोप

एपस्टीन प्रकरणातील काही पीडितांनी न्याय विभागाने विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले की, हजारो फोटो आणि एडिट केलेली कागदपत्रे जाहीर करण्यात आली. मात्र, एपस्टीनचे गुन्हे आणि त्याच्या साथीदारांबाबत कोणतीही नवी माहिती त्यात नाही. मारिया फार्मर या पीडितेने म्हटले की, 1996 मध्ये मी तक्रार दाखल केली होती. त्यावेळी एफबीआयने मौन बाळगले. मरिना नावाच्या एका पीडितेने म्हटले की, सरकार ज्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यांची नावे उघड होतील असे वाटले होते. मात्र, तसे झाले नाही. आम्हाला धोका दिला आहे.

मला बळीचा बकरा बनविले – बिल क्लिंटन

बिल क्लिंटन यांच्या प्रवक्त्यांनी म्हटले की, या प्रकरणात क्लिंटन यांना लक्ष्य करण्यात येत आहे. क्लिंटन यांनी स्वतःला या प्रकरणात बळीचा बकरा बनविण्यात आल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाशी बिल क्लिंटन यांचा काहीही संबंध नाही. बिल क्लिंटन यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे आढळलेले नाहीत.

ब्रिटिश प्रिन्स अँड्रय़ू हे 7 महिलांसोबत

बिल क्लिंटन यांची बरीच छायाचित्रे पहिल्या टप्प्यातील एपस्टीन फाईल्समध्ये आहेत. याशिवाय अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही काही छायाचित्रे जारी करण्यात आली आहेत. एका छायाचित्रात बिल क्लिंटन हे स्विमिंग पूलमध्ये काही मुलींसोबत आणि पार्टी करताना दिसतात. एका ठिकाणी त्यांच्यासोबत खुर्चीवर एक महिला बसलेली दिसते. या मुली आणि महिलांचे चेहरे ब्लर करण्यात आलेले आहेत. याशिवाय ब्रिटिश प्रिन्स अँड्रय़ू हे 7 महिलांसोबत दिसतात. ते त्यात पाच महिलांच्या मांडीवर झोपलेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे एका ठिकाणी केवळ टॉवेलवर बसलेले असून एक महिला त्यांच्या पायाला मसाज देत असल्याचे एका छायाचित्रात दिसते.

काय काय लपवलंअॅटर्नी जनरलविरोधात महाभियोग आणणार

न्याय विभागाने जारी केलेल्या फाईल्समधून अद्याप एपस्टीन याने केलेल्या गुह्यात दिग्गजांचा सहभाग किंवा संबंध असल्याबाबत माहिती उघड झालेली नाही. बहुतांश माहिती ही 2005, 2008 आणि 2019मधील तपासाशी संबंधित आहेत. भारतीय वंशाचे खासदार रो खन्ना यांनी एपस्टीन फाईल्समधील संपूर्ण माहिती सार्वजनिक न झाल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनीच एक चळवळ उभी करून सर्व फाईल्स सार्वजनिक करण्याबाबत कायदा करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. ते अॅटर्नी जनरल पॅम बॉन्डी यांच्याविरोधात महाभियोग आणण्याच्या तयारीत आहेत.

Comments are closed.