युरोपने गुगलला ठोठावला दंड; डोनाल्ड ट्रम्प संतापले, म्हणाले हा तर अमेरिकेवर अन्याय…!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे अस्वस्थता पसरली आहे. त्यातच आता जगभरातून त्यावर प्रतिक्रिया उमटत आहे. आता युरोपने गुगलला दंड ठोठावल्यानंतर ट्रम्प चांगलेच संतापले असून हा तर अमेरिकेवर अन्याय आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी गुगलसारख्या मोठ्या अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांवर युरोपने लादलेल्या मोठ्या दंडावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ही कृती भेदभावपूर्ण आणि अन्याय्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी इशारा दिला की जर युरोपने ही कारवाई सुरू ठेवली तर अमेरिकन सरकार ‘कलम 301’ अंतर्गत कठोर पावले उचलेल, जेणेकरून अमेरिकेची आर्थिक स्थिती मजबूत होईल.

दुसऱ्या कार्यकाळात ट्रम्प यांनी अमेरिकेची व्यापार तूट कमी करण्यासाठी अनेक देशांवर टॅरिफ लदाले आहेत. तसेच ते अमेरिकन कंपन्यांवर दंड आकारण्यास तीव्र विरोध करत आहेत, जेणेकरून आर्थिक परिस्थिती आणखी मजबूत करता येईल. युरोपने टेक कंपनी गुगलवर २.९ अब्ज डॉलर्स (सुमारे २९ हजार कोटी रुपये) दंड ठोठावल्याने डोनाल्ड ट्रम्प संतापले आहेत. त्यांनी म्हटले आहे की ते युरोपने अमेरिकन कंपन्यांवर दंड ठोठावला आहे, तो आपण सहन करणार नाही.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर पोस्ट करताना ट्रम्प यांनी लिहिले की, ‘युरोपने गुगलला ३.५ अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. ही अमेरिकन कंपन्या आणि गुंतवणुकीविरुद्ध भेदभावपूर्ण कारवाई आहे. युरोपने यापूर्वी गुगल आणि इतर अमेरिकन टेक कंपन्यांवर मोठा दंड ठोठावला आहे, हे अमेरिकन करदात्यावर अन्याय्य आहे.’

अॅपलचे उदाहरण देत ट्रम्प म्हणाले की, कंपनीला १७ अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला होता, जो त्यांच्या मते चुकीचा होता आणि तो परत केला पाहिजे. त्यांनी इशारा दिला की जर अशी कारवाई थांबवली नाही तर त्यांचे सरकार ‘कलम ३०१’ अंतर्गत कारवाई सुरू करेल, जेणेकरून हे “अन्याय्य दंड” रद्द करता येतील.

युरोप वेळोवेळी गुगलवर दंड ठोठावत आहे. यावेळी दंडाची रक्कम $3.5 अब्ज आहे, जी डिजिटल जाहिरात तंत्रज्ञानाच्या चुकीच्या वापरासाठी आकारण्यात आली आहे. युरोपचा आरोप आहे की गुगल त्यांच्या सेवांना प्राधान्य देते, स्पर्धक आणि ऑनलाइन प्रकाशकांवर बाजारात अन्याय्य शक्ती वापरते. त्यामुळे हा दंड आकारल्यानंतर ट्रम्प चांगलेच संतापले आहेत.

Comments are closed.