इराणने पुन्हा एकदा अमेरिकेला केले लक्ष्य, बगदादमधील दूतावास व पंचतारांकित हॉटेल व तेल क्षेत्रावर ड्रोन हल्ला
इरानणे इराकच्या विविध भागांमध्ये ड्रोन आणि रॉकेट हल्ले चढवले. या भागांमधील अमेरिकन दूतावास, ‘ग्रीन झोन’मधील एक आलिशान हॉटेल आणि दक्षिण इराकमधील तेल क्षेत्राला लक्ष्य करण्यात आले आहे.
कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या ‘ग्रीन झोन’मधील दूतावासावर अनेक ड्रोन आणि रॉकेट डागण्यात आले. एअर डिफेन्स सिस्टमने काही ड्रोन हवेतच नष्ट केले, मात्र तरीही दूतावास परिसरातून काळ्या धुराचे लोट बाहेर येताना दिसल्याचे वृत्त आहे.
विदेशी राजनैतिक अधिकारी आणि मुत्सद्दी यांच्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बगदादच्या ‘अल-रशीद’ हॉटेलवरही ड्रोनने हल्ला करण्यात आला आहे. हॉटेलच्या वरच्या मजल्यांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दक्षिण इराकमधील बसरा प्रांतात असलेल्या ‘मजनून’ तेल क्षेत्रावर दोन ड्रोन डागण्यात आले. यामध्ये एका टेलिकम्युनिकेशन टॉवरला आणि एका अमेरिकन कंपनीच्या कार्यालयाला लक्ष्य करण्यात आले आहे.
Comments are closed.