अमेरिकी वायुदलाचे लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त

अमेरिकी वायुसेनेचे एफ-16 सी लढाऊ विमान दक्षिण कॅलिफोर्नियातील वाळंवटात दुर्घटनाग्रस्त झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पायलटला वेळीच बाहेर काढण्यात आल्याने तो बचावला. उपचारासाठी पायलटला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास प्रशिक्षण सुरू असताना या विमानाला अपघात झाला. या अपघाताची चौकशी केली जाणार आहे. 2022 साली ट्रोना परिसरात एक लढाऊ विमान कोसळले होते. यात पायलटचा मृत्यू झाला होता.

Comments are closed.