इराण-अमेरिकेत पुन्हा बिनसलं; अमेरिकेचा इराणच्या क्षेपणास्त्र-ड्रोन तळांवर भीषण हल्ला, आखातात युद्धाच्या सायरन वाजणार?
जगाच्या तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मालवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा बिनसले आहे. अमेरिकन सैन्याने शुक्रवारी इराणच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र साठवणूक केंद्रासह किनारपट्टीवरील रडार यंत्रणांवर हवाई हल्ले केले. यामुळे आखातामध्ये पुन्हा एकदा युद्धाचे सायरन वाजण्याची चिन्हे आहेत. या ताज्या घडामोडींमुळे आधीच नाजूक असलेला युद्धबंदी करार मोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.