अमेरिकेने H1B आणि H4 व्हिसा मुलाखती निलंबित केल्या आहेत.
भारतीयांच्या वाढल्या अडचणी : सोशल मीडिया स्क्रीनिंगमुळे विलंब होत असल्याचा दावा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
अमेरिकेच्या एच-1बी आणि एच-4 व्हिसा मुलाखतींची प्रतीक्षा करत असलेले भारतीय आता गोंधळाच्या स्थितीत आहेत. पूर्वी त्यांच्या मुलाखती फेब्रुवारी आणि मार्च 2026 मध्ये पुनर्निर्धारित करण्यात आल्या होत्या, परंतु आता अनेक प्रकरणामंध्ये या मुलाखती ऑक्टोबर 2026 पर्यंत टाळण्यात आल्या आहेत. काही अर्जदारांना पुढील वर्षी ऑक्टोबरपर्यंतच्या तारखा देण्यात आल्या आहेत. जानेवारी महिन्यासाठी निर्धारित मुलाखतीही ऑक्टोबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासांनी डिसेंबर आणि जानेवारीसाठी निश्चित मुलाखतींना यापूर्वीच फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत टाळण्यात आल्याचे अर्जदारांना कळविले होते. व्हिसा अर्जदारांच्या सोशल मीडिया स्क्रीनिंगची कक्षा वाढविण्यात आल्याचे हा विलंब होत असल्याचे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांचे सांगणे आहे.
अनेक लोकांच्या नोकऱ्या धोक्यात
याचदरम्यान वारंवार रद्द होणाऱ्या मुलाखतींमुळे अनेक तंत्रज्ञांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. डिसेंबरच्या मध्यापासून मोठ्या प्रमाणावर मुलाखतींची वेळ रद्द होणे आणि त्यांचे वेळापत्रक पुन्हा ठरविण्याच्या घटना वाढल्या आहेत. ज्या मुलाखती जानेवारी 2026 मध्ये निश्चित करण्यात आल्या होत्या, त्यांना आता वर्षाच्या अखेरच्या तिमाहीपर्यंत टाळले जात असल्याचे इमिग्रेशन वकिलांनी सांगितले.
कायदेशीर पर्याय मर्यादित
याप्रकरणी कायदेशीर पर्याय मर्यादित आहेत. प्रभावित अर्जदारांनी शक्य झाल्यास स्वत:च्या नियुक्तीदाराकडे रिमोट वर्क किंवा रजा मंजूर करण्याची विनंती करावी. मुलाखती रद्द होण्याच्या विरोधात थेट कारवाई करणे अवघड आहे. अशास्थितीत अर्जदारांनी प्रत्येक गोष्टीला नोंद करवून ठेवावे, जेणेकरून भविष्यात नोकरी किंवा व्हिसाशी निगडित समस्यांपासून वाचता येईल असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. अनेक लोकांनी यापूर्वी तिकीट बुक केल्या होत्या किंवा सुटी निश्चित केली होती, किंवा व्हिसा स्टॅम्पिंगसाठी अनेक जण भारतात आले होते, परंतु आता त्यांना मुलाखतीची वेळ रद्द झाल्याचे कळल्याने त्यांच्यासमोर समस्या निर्माण झाली आहे.
Comments are closed.