रशियाकडून तेल घेतले तर 100 टक्के टॅरिफ, अमेरिकेने भरला दम
रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीवरून अमेरिकेने दम भरला आहे. हिंदुस्थानसह इतर कोणत्याही देशांनी रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्यास त्या देशांवर अमेरिका 100 टक्के टॅरिफ लावेल. तसे विधेयक अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज्ने मंजूर केले आहे. हे विधेयक आज अंतिम मतदानासाठी मांडले जाणार आहे.
‘द लिंडसे ओ ग्रॅहम सँक्शनिंग रशिया अँड इराण अॅक्ट’ हे विधेयक मंगळवारी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज्मध्ये मांडण्यात आले होते. ते 214 विरुद्ध 211 मतांनी मंजूर झाले. डेमोव्रॅटिक पक्षाच्या दोन खासदारांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान करत धक्का दिला. हे विधेयक राष्ट्राध्यक्षांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यापूर्वी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज्मध्ये मंजूर होणे आवश्यक आहे. या विधेयकाला अंतिम मंजुरी मिळाल्यास राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मनमानी आयात शुल्क लावण्याचे अधिकार मिळतील. याशिवाय इराणवर लावण्यात आलेल्या निर्बंधांनादेखील मुदतवाढ देण्यात येणार आहे. याचा सर्वाधिक फटका हिंदुस्थान आणि चीन या दोन देशांना भविष्यात बसू शकतो.
रशियाच्या मित्रांवर दबाव
रशियाकडून सर्वाधिक कच्चे तेल खरेदी करणाऱयांमध्ये हिंदुस्थान आणि चीन या देशांचा समावेश आहे. रशियाच्या मित्रांवर दबाव आणण्याचा प्रयत्न या विधेयकाद्वारे केला आहे. रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करणाऱया देशांवर 100 टक्के टॅरिफ लावण्यात येईल.
Comments are closed.