Israel Iran War – मोदी आणि मी, जे ठरवतो ते करून दाखवतो! युद्धादरम्यान ट्रम्प यांच्या विधानाने संभ्रम

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भरभरून कौतुक केले आहे. ‘पंतप्रधान मोदी आणि मी असे दोन लोक आहोत, जे हाती घेतलेले काम पूर्ण करूनच दाखवतो,’ अशा शब्दांत ट्रम्प यांनी दोन्ही नेत्यांमधील संबंध स्पष्ट केले. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराण युद्ध सुरू झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी पहिली चर्चा झाली होती. याची माहिती अमेरिकन दूतावासाने शुक्रवारी सोशल मीडियावर शेअर केली. पण ट्रम्प यांच्या या भूमिकेने संभ्रमाची स्थिती आहे. ट्रम नेमके कशावर बोलले हे पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही.

ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी या दोन्ही नेत्यांनी चर्चेदरम्यान आखाती देशातील अस्थिरतेवर गंभीर चिंता व्यक्त केली. यावेळी ट्रम्प यांनी हिंदुस्थानसोबतचे अमेरिकेचे संबंध भविष्यात अधिक मजबूत होतील, असा विश्वास व्यक्त केला. बहुतांश लोक जे करू शकत नाहीत, ते मोदी आणि मी करून दाखवतो, असे म्हणत त्यांनी हिंदुस्थानच्या भूमिकेचे महत्त्व स्पष्ट केले. विशेषतः युद्धाच्या काळात अमेरिकेने हिंदुस्थानसा दिलेले हे महत्त्व जागतिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चर्चेनंतर शांततेचे आवाहन केले आहे. “हिंदुस्थान आखाती देशात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ खुली आणि सुरक्षित राहणे जागतिक व्यापारासाठी अत्यंत आवश्यक आहे,” असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. युद्धाची तीव्रता कमी करण्यासाठी आणि प्रादेशिक स्थिरता राखण्यासाठी दोन्ही देश सातत्याने एकमेकांच्या संपर्कात राहतील, यावर या संवादात एकमत झाले.

Comments are closed.