Us Israel Iran War – बहरीनमध्ये अमेझॉनच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र हल्ला, इराणकडून अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांना लक्ष्य
आखाती देशांतील संघर्ष शिगेला पोहचला आहे. इराणने आता अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांना लक्ष्य केले आहे. इराणने बहरीनमधील अमेरिकन दिग्गज कंपनी अमेझॉनच्या मुख्यालयाला लक्ष्य करून एक मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात बेटेल्को या दूरसंचार कंपनीच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. ही कंपनी अमेझॉन वेब सर्विससाठी काम करते. बहरीन सरकारने या हल्ल्याची पुष्टी केली आहे. या हल्ल्यामुळे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे.
इराणी लष्कराने मंगळवारी 1 एप्रिलपासून गूगल, मायक्रोसॉफ्ट आणि अॅपलसह 18 प्रमुख अमेरिकन कंपन्यांवर हल्ला करण्याचा इशारा दिला होता. या हल्ल्यानंतर सिलिकॉन व्हॅलीतील दिग्गज कंपन्यांच्या सुरक्षेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. आखातातील संघर्ष आता आयटी आणि डिजिटल पायाभूत सुविधांपर्यंत पोहोचला असून याला डिजिटल युद्धाची सुरूवात म्हणून पाहिले जात आहे.
इराणने बुधवारी पहाटे कतारच्या किनाऱ्याजवळ एका तेलवाहू जहाजावर आणि कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावरही हल्ला केला. दरम्यान, येमेन आणि इराणकडून होणाऱ्या हल्ल्याबाबत इस्रायलनेही सतर्कतेचा इशारा दिला आहे. इस्रायली लष्कराने लेबनॉनमधील हल्लेही तीव्र केले असून, त्यात अनेक जण जखमी झाल्याची पुष्टी झाली आहे.
Comments are closed.