‘हिंदुस्थानी वाईट असतात’ म्हणत अमेरिकेत 66 वर्षीय नर्सवर रुग्णाचा हल्ला; चेहरा विद्रुप केला, दृष्टी जाण्याचा धोका

अमेरिकेमध्ये हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांवर सातत्याने हल्ले सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानी वंशाच्या विद्यार्थ्यांवर एकामागोमाग हल्ले होत असल्याचे उघड झाले होते. आता हे लोण रुग्णालयापर्यंत पोहोचले असून फ्लोरिडामध्ये 33 वर्षीय अमेरिकेन नागरिकाने हिंदुस्थानी वंशाच्या 66 वर्षीय नर्सवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा चेहरा विद्रुप झाला असून तिच्या तोंडाची हाडं मोडली आहेत. तसेच तिच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी जाण्याचीही शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.

निलम्मा लाल असे जखमी नर्सचे नाव असून स्कॅटलबेरी असे आरोपीचे नाव आहे. वर्ण द्वेषी टिप्पणी आणि हत्येचा प्रयत्न या कलमांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 19 फेब्रुवारी रोजी घडली असून 27 फेब्रुवारी रोजी आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले.

Comments are closed.