यूएस बॅडमिंटनचा थरार आजपासून; लक्ष्य सेन, तन्वी शर्मावर हिंदुस्थानची मदार
मंगळवारपासून सुरू होणाऱ्या यूएस ओपन बॅडमिंटन स्पर्धेत हिंदुस्थानच्या मोहिमेचे नेतृत्व अनुभवी खेळाडू लक्ष्य सेन करणार असून, महिला गटात युवा खेळाडू तन्वी शर्माकडे सर्वांचे लक्ष असेल. यावेळी जागतिक क्रमवारीत 14व्या स्थानावर असलेल्या लक्ष्य सेनला दुसरे मानांकन देण्यात आले आहे.
पुरुष एकेरीत हिंदुस्थानचा अनुभवी खेळाडू किदाम्बी श्रीकांत पहिल्या सामन्यात चायनीज तैपेईच्या लियाओ झुओ-फूविरुद्ध खेळणार आहे. महिला एकेरीत पाचव्या मानांकित तन्वी शर्मा आणि सहाव्या मानांकित देविका सिहाग यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. जागतिक क्रमवारीत अनुक्रमे 32व्या आणि 34व्या स्थानावर असलेल्या या दोन्ही खेळाडू पहिल्या फेरीत आव्हानात्मक सामने खेळणार आहेत. 17 वर्षीय तन्वीचा सामना जर्मनीच्या यव्होन लीशी होणार असून देविका पेरूच्या इनेस लुसिया कॅस्टिलो सालाझारविरुद्ध खेळणार आहे.
Comments are closed.