ट्रम्प आता ‘मतदार ओळखपत्र’ धोरण आणणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता नवीन ‘मतदार ओळखपत्र’ धोरण आणणार आहे. ‘मतदार ओळखपत्र’ धोरण आणि ‘सेव्ह अॅक्ट’ला मिळालेल्या पाठिंब्यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय-अमेरिकन समुदायात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सेव्ह अॅक्ट विधेयक सिनेटमध्ये मंजूर झाले तर नोव्हेंबरच्या मध्यावधी निवडणुकीत नवीन नियम लागू होतील. यामुळे हिंदुस्थान-अमेरिकन समुदायातील चिंता वाढली. याच भीतीमुळे जवळपास 12.5 लाख हिंदुस्थान-अमेरिकन नागरिक मतदान प्रक्रियेपासून स्वतःला दूर ठेवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Comments are closed.