अमेरिकेत AI कंपन्यांचे शेअर्स कोसळले,भारतीय शेअर बाजाराची धाकधूक वाढली, ब्लॅक मंडेची भीती
यूएस शेअर मार्केट क्रॅश नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारातील (Indian Share Market) गुंतवणूकदारांचं लक्ष आजच्या ट्रेडिंगकडे लागलं आहे. कारण शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाली. अमेरिकन गुंतवणकूदारांनी टेक कंपन्यांच्या (tech company shares) शेअरची धडाधड विक्री केल्यानं मोठं नुकसान झालं आहे. यामुळं भारतीय शेअर बाजारात आजचा सोमवार ब्लॅक मंडे ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकन शेअर बाजारातील घडामोडींमुळं मार्च 2020 आणि एप्रिल 2025 च्या घसरणीची आठवण झाली. याशिवाय गिफ्ट निफ्टीमध्ये देखील 350 अंकांची घसरण तो 23091 पर्यंत घसरला, यामुळं भारतीय शेअर बाजारात आज नेमकं काय घडणार याकडे गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं आहे. गिफ्ट निफ्टी 7 जूनला बंद असल्यानं आता अमेरिकन शेअर बाजारातील घसरणीनंतर आज 8 जूनला गिफ्टी निफ्टीत काय घडतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अमेरिकेत नेमकं काय घडलं?
शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजारात टेक कंपन्यांच्या शेअरमध्ये धडाधड विक्री झाली. अमेरिकन शेअर बाजार डाओ जोन्स 695.15 अंकांनी घसरुन 50866.78 अंकांवर बंद झाला. नॅस्डॅक 1121 अंकांनी घसरुन 25709.43 वर बंद झाला. एस अँड पी 500 निर्देशांक 200.57 अंकांनी घसरला आणि 7383.74 अंकांवर बंद झाला. सर्वात भीतीदायक बाब म्हणजे नॅस्डॅकमध्ये एप्रिल 2025 नंतर सर्वात मोठी घसरण झाली आहे.
अमेरिकन शेअर बाजारातील घसरणीची कारणं?
टेक कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण: अमेरिकन शेअर बाजारातील घसरणीचं कारण सेमीकंडक्टर म्हणजेच चिप कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. iShares Semiconductor ETF एका दिवसात 10 टक्क्यांनी घसरला.मार्च 2020 नंतरची ही सर्वात मोठी घसरण दिसून आली.
एआयचा फुगा फटतोय?
तज्ज्ञांच्या मते गेल्या दोन महिन्यात एआय आणि सेमीकंडक्टर शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. गुंतवणूदारांच्या पोर्टफोलिओत टेक कंपन्यांच्या शेअरचा वाटा वाढला होता. त्यामुळं नफा वसुली अपेक्षित होती, असं तज्ज्ञांनी म्हटलं. मार्क हॅकेट यांच्या मते गुंतवणूकदार दीर्घकाळापासून विक्रीच्या प्रतीक्षेत होते.
अमेरिकन नोकऱ्यांची आकडेवारी
शुक्रवारी अमेरिकेत मे महिन्यातील नोकऱ्यांची आकडेवारी समोर आली. मे महिन्यात 1.72 लाख नव्या नोकऱ्या निर्माण झाल्या. बाजाराला फक्त 80 हजार नोकऱ्यांची अपेक्षा होती. अमेरिकन अर्थव्यवस्था बाजाराच्या अपेक्षेपेक्षा अधिक मजबूत दिसून आली. यामुळं शेअर बाजाराला फटका बसला.
नोकऱ्यांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त असल्यानं आणि अमेरिकन अर्थव्यवस्था मजबूत झाल्यानं फेड रिझर्व्हकडून व्याज दरात कपातीची शक्यता कमी झाल्यानं बाँड यील्ड वाढले आहेत.
पुढील महिन्यात स्पेसेक्सचा आयपीओ येणार आहे. हा जगातील सर्वात मोठा आयपीओ मानला जातोय. त्यामुळं गुंतवणूकदार टेक कंपन्यांच्या शेअरची विक्री करुन पैसे जमा करत आहेत. दुसरीकडे बिटकॉईनमध्ये देखील मोठी घसरण झाली असून ते 60 हजार डॉलर्सच्या खाली पोहोचले आहेत.
भारतात ब्लॅक मंडे?
गिफ्ट निफ्टी शेवटच्या ट्रेडिंग 350 अंकांनी घसरला होता. बाँड यील्ड वाढले आहेत, बिटकॉईनच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. जागतिक गुंतवणूकदारांची जोखीम स्वीकारण्याची मानसिकता कमी झाली असल्यानं भारतीय शेअर बाजारात काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Comments are closed.