जॉर्डनमध्ये 2 सैनिक ठार झाल्यानंतर अमेरिकेची सटकली; इराणवर पाडला क्षेपणास्त्रांचा पाऊस, आखातात युद्धाचे काळे ढग
इराणने जॉर्डनमध्ये अमेरिकेच्या लष्करी तळावर भीषण हल्ला केला असून यात दोन अमेरिकन सैनिक ठार, तर चार सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. इराणच्या थेट हल्ल्यात प्रथमच अमेरिकेच्या सैनिकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे अमेरिकेची चांगलीच सटकली असून अमेरिकन लष्कराने इराणमधील विविध ठिकाणांवर क्षेपणास्त्रांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एस्सवर इराणवरील कारवाईची माहिती दिली आहे.
आज संध्याकाळी 6 वाजता ET, अमेरिकन सैन्याने कमांडर इन चीफच्या दिशेने इराणवर नवीन हवाई हल्ले सुरू केले. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये व्यावसायिक शिपिंगला धोका देण्याची आणि इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डला त्वरीत शिक्षा देण्याची इराणची क्षमता आणखी कमी करण्यासाठी या हल्ल्यांची रचना करण्यात आली आहे…
– यूएस सेंट्रल कमांड (@CENTCOM) 18 जुलै 2026
Comments are closed.