अमेरिकेचा इराणच्या केशम बेटावर मोठा हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीत अनेक जोरदार स्फोट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आखाती देशांमधील वाढत्या तणावाने आता भीषण रूप धारण केले असून, अमेरिकेने इराणवर मोठा लष्करी हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेले संकेत अखेर खरे ठरले असून, मंगळवारी सकाळी होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये वसलेल्या इराणच्या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या केशम बेटावर अनेक शक्तिशाली स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनीही या स्फोटांना दुजोरा दिला आहे.

विशेष म्हणजे, अमेरिकेत मध्यावधी निवडणुकांसाठी आजच मतदान होत असून, या राजकीय घडामोडींदरम्यानच हा हल्ला झाल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एका अमेरिकन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील काही वेढलेल्या इराणच्या महत्वाच्या ठिकाणांवर बचावात्मक हल्ले केले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे अमेरिकेच्या अध्यक्षांवर इराणविरुद्ध आणखी एक मोठी लष्करी कारवाई करण्यासाठी सातत्याने दबाव टाकत होते, जेणेकरून निवडणुकांनंतर हल्ले पुन्हा एकदा नव्याने सुरू करता येतील.

ट्रम्प इराणवर अण्वस्त्र डागण्याच्या तयारीत, अमेरिकन विश्लेषकांच्या दाव्याने खळबळ

दरम्यान, या संभाव्य लष्करी संघर्षामुळे संपूर्ण आखाती देशांमध्ये तणाव निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करत अमेरिकेच्या अनेक प्रादेशिक मित्र राष्ट्रांनी आणि पश्चिम आशियाई देशांनी या नव्या हल्ल्यांना तीव्र विरोध दर्शवला आहे. मात्र, या हल्ल्यामुळे आगामी काळात आखातातील संघर्ष अधिक पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, संपूर्ण जगाचे या परिस्थितीकडे लक्ष लागले आहे.

Comments are closed.