US Minuteman III Test – अमेरिकेने केली अणु क्षेपणास्त्राची चाचणी, १४ हजार किमीची आहे मारक क्षमता

कॅलिफोर्नियातील व्हॅंडेनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून अमेरिकेने मिनटमॅन-३ या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची (ICBM) यशस्वी चाचणी केली. ही चाचणी मंगळवारी करण्यात आली असून, क्षेपणास्त्राने प्रशांत महासागरातील निर्धारित लक्ष्यावर अचूक निशाणा साधला. अमेरिकन हवाई दलाच्या ग्लोबल स्ट्राइक कमांडने ही माहिती दिली.
मिनिटमॅन-३ क्षेपणास्त्राची मारक क्षमता सुमारे १४ हजार किलोमीटरपर्यंत आहे आणि ही अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. ही चाचणी अमेरिकेच्या अण्वस्त्र निरोधक क्षमतेची विश्वासार्हता तपासण्यासाठी आणि सैन्य दलाच्या तयारीची खात्री करण्यासाठी करण्यात आली, असे बोलले जात आहे.
या चाचणीत क्षेपणास्त्राला कोणतेही अण्वस्त्र जोडलेले नव्हते. मिनिटमॅन-३ हे अमेरिकेच्या भू-आधारित अण्वस्त्र सैन्याचा महत्त्वाचा भाग आहे. अमेरिकेकडे सुमारे ४०० हून अधिक अशी क्षेपणास्त्रे तैनात आहेत. ही चाचणी दरवर्षी केली जाते जेणेकरून प्रणालीची कार्यक्षमता आणि सुरक्षितता तपासली जाऊ शकेल. दरम्यान, जागतिक स्तरावर अशा चाचण्यांकडे लक्ष ठेवले जाते, कारण त्या आंतरराष्ट्रीय तणाव आणि शस्त्रास्त्र स्पर्धेशी संबंधित असतात. अमेरिकेने मात्र ही चाचणी शांततापूर्ण आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने केली असल्याचे स्पष्ट केले आहे.

Comments are closed.