अडचणी वाढल्या! अमेरिका व्हिसाच्या नियमात बदल, अर्जदाराला द्यावी लागणार दोन प्रश्नांची उत्तरे

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेत जाणाऱयांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. नवीन एच-1 बी व्हिसा देण्यापूर्वी पूर्ण 3 वर्षासाठी बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडलेला असताना आता अमेरिकन परराष्ट्र विभागाने व्हिसा अर्जामध्ये आणखी दोन प्रश्न जोडले आहेत. यामुळे अर्जदारांच्या अडचणी वाढणार आहेत.

अमेरिकन व्हिसासाठी अर्ज करणाऱया अर्जदारांना आता दोन्ही प्रश्नांची उत्तरे देणे बंधनकारक असणार आहेत. यातील पहिला प्रश्न तुमच्या देशात किंवा राहता त्या ठिकाणी तुम्ही कधी छळ किंवा दुर्व्यवहार अनुभवला आहे का?, आणि मायदेशी परतल्यानंतर तुम्हाला तिथे छळ होण्याची भीती वाटते का? असे हे दोन प्रश्न आहेत. या दोन्ही प्रश्नाची उत्तर अर्जदाराने हो दिले तर व्हिसा अधिकारी असा निष्कर्ष काढू शकतात की, संबंधित व्यक्तीला मायदेशी परतण्याची इच्छा नाही. ते अमेरिकेतच आश्रय घेण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे त्यांचा व्हिसा नाकारला जाऊ शकतो. जर अर्जदाराने या प्रश्नाचे उत्तर नाही दिले तर अर्जदाराचा जुना जवाब पुरावा म्हणून वापरला जाईल. व्हिसा घेताना तर भीती नव्हती, मग आत्ता कशी?, असा सवाल उपस्थित करून त्याचा आश्रयाचा दावा खोटा ठरवला जाईल.

एच-1बी व्हिसा विधायक काय आहे?

अमेरिकन काँग्रेसच्या काही खासदारांनी नवीन एच-1 बी व्हिसा देण्यावर पूर्ण 3 वर्षांसाठी बंदी घालण्यासाठी विधेयक मांडले आहे. सध्या अमेरिकेतील मोठय़ा टेक कंपन्या आणि विद्यापीठांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास याचा सर्वात जास्त फटका आयटी क्षेत्रातील हिंदुस्थानी तरुणांना बसणार आहे. हिंदुस्थानी तरूणांसाठी अमेरिका हे हक्काचे जॉप डेस्टिनेशन राहिलेले आहे. हे विधेयक अद्याप मंजूर झाले नाही.

Comments are closed.