…तर कच्च्या तेलाच्या किमती 40 डॉलरपर्यंत घसरतील! अमेरिकेचा मोठा दावा
सध्या जगाचे लक्ष अमेरिका -इराण संघर्षावर केंद्रित झाले आहे. या भू-राजकीय संकटामुळे ऊर्जा बाजारात कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यातच आता अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी कच्च्या तेलाच्या किमतीबाबत मोठा दावा केला आहे. त्याने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.
इराणसोबतचा लष्करी संघर्ष संपताच कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने खाली येतील. बेसेंट यांच्या मते, तेलाच्या किमती प्रति बॅरल ४० डॉलरपर्यंत खाली येऊ शकतात. वाढत्या ऊर्जा किमतींमुळे जगभरात महागाईबद्दल चिंता वाढली आहे.त्याचवेळी त्यांनी हा दावा केल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
कच्च्या तेलाचा सध्या तुटवडा जाणवत आहे. मात्र, बेसेंट यांनी स्पष्ट केले की, इराणच्या संकटानंतर बाजारात कच्च्या तेलाचा लक्षणीय अतिरिक्त पुरवठा होईल. मोठ्या प्रमाणात तेल उपलब्ध होईल. त्यामुळे किमती ४० ते ५० डॉलरने खाली येऊ शकतात. सध्या, ब्रेंट क्रूडचा व्यापार प्रति बॅरल ९५ डॉलरपेक्षा जास्त दराने होत आहे. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) देखील ९१ डॉलरच्या आसपास आहे. जुलै महिन्यानंतरची ही सर्वोच्च पातळी आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील अलीकडील लष्करी हल्ल्यांमुळे ऊर्जा दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींचा महागाईवर थेट परिणाम होतो. बेझंट यांनी स्पष्ट केले की व्याजदर आणि तेलाच्या किमतींमध्ये इतका जवळचा संबंध यापूर्वी कधीही दिसला नव्हता. सध्या, १० वर्षांच्या अमेरिकन बाँडचे उत्पन्न २०२३ नंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. ते म्हणतात की इराणचा वाद संपल्यानंतर जेव्हा तेल स्वस्त होईल, तेव्हा महागाईचा दरही लक्षणीयरीत्या कमी होईल. यामुळे जागतिक व्याजदरातही घट होण्याची शक्यता आहे. तथापि, युद्ध कधी संपेल यासाठी त्यांनी कोणतीही कालमर्यादा दिली नाही.
Comments are closed.