10 मिनिटे ‘ढगफुटी’! न्यूयॉर्क पाण्यात!! विमान वाहतूक; मेट्रो सेवा ठप्प, इमारतींच्या बेसमेंटमध्ये पाणी

ढगफुटीसदृश पावसाने अमेरिकेचे महत्त्वाचे आर्थिक केंद्र असलेले न्यूयॉर्क शहर पाण्यात बुडाले. अवघी 10 मिनिटे झालेल्या पावसाने शंभर वर्षांतील रेकॉर्ड मोडला. विमान वाहतूक, मेट्रो, बससेवा ठप्प झाली. हजारो घरांतील वीजपुरवठा खंडित झाला. इमारतींच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरले. पावसाने झोडपल्यामुळे न्यूयॉर्कचे जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, या पावसात दोनजणांचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारी सकाळपासूनच न्यूयॉर्क आणि परिसरात पाऊस सुरू होता. मात्र, 10 मिनिटे ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसाने शंभर वर्षांचा रेकॉर्ड मोडला. शहरातील सबवे ट्रक, रस्ते, इमारतीचे बेसमेंट पाण्याखाली गेले. अनेक ठिकाणी झाडे कोसळली. मेट्रो सेवाही ठप्प झाली. हजारो प्रवासी स्टेशनवर अडकले. वीजपुरवठा अनेक भागांत खंडित झाला. जेएफके, लागार्डिया आणि नेवार्क या तीन विमानतळांवरील उड्डाणे रद्द केली. या पावसाने न्यूयॉर्कचे जनजीवन विस्कळीत केले.

Comments are closed.