'या' देशाचे क्रिकेट बोर्ड दिवाळखोरीत? काही आठवड्यांतच सर्व पैसा संपणार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
यूएसए क्रिकेट एसीई भागीदारी संपली: अमेरिका क्रिकेट बोर्डाने नुकताच आपला निधी भागीदार अमेरिकन क्रिकेट एंटरप्रायझेस सोबतचा 50 वर्षांचा करार अचानक रद्द केला आहे. ही तीच कंपनी आहे जिने मेजर लीग क्रिकेट (MLC) सुरू केली होती आणि अनेक वर्षांपासून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करत होती. मात्र आता परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की USA क्रिकेट बोर्ड लवकरच दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचू शकतो. (USA Cricket bankruptcy)
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, 3 तास चाललेल्या बैठकीनंतर, बोर्डाच्या पाच सदस्यांनी हा करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला, तर 4 संचालक या निर्णयाच्या विरोधात होते. कायदेशीर सल्लागारांनीही हा निर्णय धोकादायक ठरू शकतो, असा इशारा दिला होता. तरीही बोर्डाने ACE सोबतचे संबंध तोडले.
रिपोर्टनुसार, जर ACE कडून तिमाही निधी मिळाला नाही, तर USA क्रिकेट पुढील काही आठवड्यांत पूर्णपणे आर्थिक संकटात सापडू शकते. आगामी स्पर्धांची तयारी, विशेषतः 2026च्या टी20 वर्ल्ड कपची तयारी धोक्यात आली आहे. वेस्ट इंडिज ‘अ’ आणि वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्ध ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या सराव सामन्यांसाठी सुमारे 7 लाख डॉलर्सचे बजेट तयार करण्यात आले होते, परंतु आता त्या योजनांवरही संकट आलं आहे. (Cricket financial crisis)
नेमकं प्रकरण काय आहे?
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात USA संघाच्या निधी आणि व्यवस्थापनाबाबतच्या वादातून झाली. ACE ने 2019 पासून आतापर्यंत 10 मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली होती. खेळाडूंचे वेतन, टूर्नामेंटचा खर्च आणि इतर सर्व कामकाज ACE सांभाळत होती. पण बोर्डाचे म्हणणे आहे की, ACE ने उच्च-कार्यक्षमता केंद्र (high-performance center) उभारण्यासारख्या काही जबाबदाऱ्या पूर्ण केल्या नाहीत. (USA Cricket legal issues) तर, ACE ने यावर दावा केला की त्यांनी ग्रँड प्रेयरी स्टेडियम (Grand Prairie Stadium) बांधून आपले वचन पाळले, जिथे 2024 वर्ल्ड कपचे सामने देखील झाले होते.
Comments are closed.