ट्रम्प यांचे पाकड्यांना गिफ्ट; बलूच लिबरेशन आर्मी आणि माजीद ब्रिगेड दहशतवादी संघटना घोषित

अमेरिकेने जगातील अनेक देशांवर टॅरिफ लादल्याने अमेरिकेशी त्यांचे संबंध ताणले गेले आहेत. टॅरिफच्या मुद्द्यावरून अमेरिका- हिंदुस्थान यांच्यात खटके उडाले असून हिंदुस्थाननेही अमेरिकेला प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे आता अमेरिकेने हिंदुस्थानवर दबाव टाकण्यासाठी पाकिस्तानशी मैत्री वाढवली आहे. तसेच अमेरिकेने पाकिस्तानची इच्छा पूर्ण करत बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि माजिद ब्रिगेडला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. याचे पडसाद जगभरात उमटण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांनी पाकिस्तानची इच्छा पूर्ण करत बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि माजिद ब्रिगेडला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. अमेरिकेने पाकिस्तानातील बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) आणि त्यांच्या सहकारी ‘द माजिद ब्रिगेड’ यांना परदेशी दहशतवादी संघटना (एफटीओ) म्हणून घोषित केले आहे. अमेरिकेने म्हटले आहे की हे पाऊल दहशतवादविरोधी प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग आहे. मात्र, यामागे मोठे राजकारण असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी बलुच बंडखोरांविरुद्ध जागतिक स्तरावर कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला खूश करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने याबाबतची माहिती दिली आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिकन सरकारच्या वचनबद्धतेच्या दृष्टीने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी सोमवारी याबाबतची घोषणा केली. त्यांनी सांगितले की बीएलएला पहिल्यांदा 2019 मध्ये “स्पेशली डेजिग्नेटेड ग्लोबल टेररिस्ट” (एसडीजीटी) च्या यादीत टाकण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही या संघटनेने आणि त्यांच्या गटातील माजिद ब्रिगेडने अनेक मोठे हल्ले घडवत त्याची जबाबदारी घेतली.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे की, 2024 मध्ये बीएलएने कराची विमानतळ आणि ग्वादर बंदर प्राधिकरण संकुलाजवळ आत्मघाती हल्ले केले. त्याच वेळी, मार्च 2025 मध्ये या संघटनेने क्वेटाहून पेशावरला जाणाऱ्या ‘जाफर एक्सप्रेस’ ट्रेनचे अपहरण केले, ज्यामध्ये 31 लोकांचा मृत्यू झाला आणि 300 हून अधिक प्रवाशांना ओलीस ठेवले.
ही कारवाई दहशतवादाविरुद्ध अमेरिकेची वचनबद्धता दर्शवते. दहशतवाद्यांना बंदी घालणे आणि त्यांचे आर्थिक स्रोत संपवण्याचा हा एक प्रभावी मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, यामागे मोठे राजकारण असल्याची चर्चा जगभरात होत आहे.
Comments are closed.