'X' अचानक खाली गेल्याने व्यथित झालेले वापरकर्ते.
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
ट्विटर म्हणून ओळखले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. भारतासह जगभरातील अनेक भागात गुरुवारी ‘एक्स’मध्ये व्यत्यय आल्याचे दिसून आले. खंडित सेवेमुळे अनेक युजर्सनी याबाबत नाराजी व्यक्त केली. ‘एक्स’ प्लॅटफॉर्म अचानक व्यवस्थित काम करत नसल्याची तक्रार अनेक वापरकर्त्यांनी नोंदवली. अनेक युजर्सना त्यांचे फीड लोड होण्यास त्रास झाला. तर काहींना नवीन पोस्ट दिसत नव्हत्या. काही वापरकर्त्यांना अॅप आणि वेबसाईट दोन्ही वापरता येत नव्हते. या अचानक आलेल्या व्यत्ययामुळे लाखो लोक त्रस्त झाल्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. ही समस्या समोर येताच मोठ्या संख्येने वापरकर्त्यांनी त्यांच्या तक्रारी नोंदवण्यास सुरुवात केली.
Comments are closed.