बॉलीवूड मध्ये अजून एक घटस्फोट; आता बारी गोविंदा आणि बायकोची … – Tezzbuzz

बॉलिवूडमधील जोडप्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या अनेकदा ऐकायला मिळतात. बॉलिवूडमध्ये नाती जास्त काळ टिकत नाहीत. पण काही जोडपी अशी आहेत ज्यांच्या लग्नाला ३० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. असेच एक जोडपे म्हणजे गोविंदा आणि सुनीता आहुजा. पण अलिकडेच काही मीडिया रिपोर्ट्स समोर आले आहेत, ज्यात गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता वेगळे होणार असल्याचे म्हटले आहे.

जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, गोविंदाचे एका मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर आहे. सुनीतासोबतच्या त्याच्या घटस्फोटाचे हेच कारण आहे. पण घटस्फोटाच्या या वृत्ताला अभिनेता गोविंदा किंवा त्याची पत्नी सुनीता यांनी दुजोरा दिला नाही.

गोविंदाची पत्नी सुनीता हिने अलीकडेच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक मुलाखती दिल्या. एका मुलाखतीत सुनीता म्हणाली होती की तिने तिच्या आयुष्यातील अनेक वर्षे तिच्या पती आणि मुलांची काळजी घेण्यासाठी समर्पित केली आहेत, आता ती स्वतःसाठी वेळ देते. ती तिचा वाढदिवस एकटीच साजरा करते आणि एकटीच बाहेर जाते. सुनीता यांनी असेही सांगितले की, तिच्या आणि गोविंदाच्या वेळा जुळत नसल्याने ते दोघेही वेगवेगळ्या घरात राहतात.

गोविंदा आणि सुनीता यांचा प्रेमविवाह होता. दोघांचेही लग्न १९८७ मध्ये झाले होते, त्यांच्या लग्नाला जवळजवळ ३७ वर्षे झाली आहेत. त्यांना एक मुलगा यश आणि मुलगी टीना आहे. टीनाने चित्रपटांमध्ये काम केले आहे, यश देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करू शकतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

चित्रपट हेच माझं पाहिलं प्रेम आणि राहील; समान्थाने व्यक्त केला आदर…

Comments are closed.