‘रांझणा’चा क्लायमॅक्स AI ने बदलल्याने आनंद एल राय करणार कायदेशीर कारवाई; हा अभिनेता देणार पाठिंबा – Tezzbuzz
'रझाना‘च्या (Ranjhana) निर्मिती कंपनीने दिग्दर्शक आनंद एल राय, अभिनेता धनुष आणि उर्वरित स्टारकास्टला न कळवता एआय द्वारे चित्रपटाचा क्लायमॅक्स बदलला. बदललेल्या क्लायमॅक्ससह हा चित्रपट तमिळ आवृत्तीमध्ये देखील पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. आनंद एल राय आणि धनुष दोघेही यामुळे नाराज आहेत. आता ते एकत्र कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहेत.
आनंद एल राय त्यांच्या निवेदनात म्हणतात, ‘मला माझ्या उर्वरित चित्रपटांबद्दल खूप काळजी वाटते. धनुष देखील काळजीत आहे. अशा बाह्य हस्तक्षेपापासून आमच्या सर्जनशील आशयाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही न्यायालयीन पद्धतींचा शोध घेत आहोत आणि त्यांचा विचार करत आहोत.’
‘रांझणा’ चित्रपटाच्या तमिळ क्लायमॅक्समध्ये, कुंदन (धनुष) हॉस्पिटलच्या बेडवर डोळे उघडतो आणि उभा राहतो. त्याचे मित्र बिंदिया (स्वरा भास्कर) आणि मुरारी (झीशान अय्यूब) आनंदी असतात. त्यानंतर, मोठा आणि धाकटा कुंदन बनारसच्या रस्त्यांवर दाखवला जातो आणि चित्रपट संपतो. तर आनंद एल राय दिग्दर्शित ‘रांझणा’ मध्ये, कुंदर शेवटी मरतो. कुंदनचा मृत्यू हा चित्रपट वेगळा आणि खास बनवतो. चित्रपटाच्या शेवटी झालेल्या या छेडछाडीमुळे आनंद एल राय संतापले आहेत.
धनुषने काही दिवसांपूर्वी ट्विटरवर ट्विट केले होते, ज्यामध्ये त्याने लिहिले होते की, ‘रांझणा चित्रपटाचा क्लायमॅक्स एआय द्वारे बदलण्यात आला आणि तो पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटातील या बदलाने मला अस्वस्थ केले आहे. या बदलामुळे चित्रपटाचा आत्मा हिरावून घेण्यात आला आहे. माझ्या आक्षेपानंतरही चित्रपट बदलण्यात आला. हा १२ वर्षांपूर्वी मी पाहिलेला चित्रपट नाही. एआयचा असा वापर कला आणि कलाकारांसाठी चिंतेचा विषय आहे. हा चित्रपटासाठी धोका आहे.’
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
चित्रपट उद्योगाबाबत केंद्राने उचलले मोठे पाऊल, राज्यांना कमी किमतीचे चित्रपटगृह बांधण्याचे आवाहन
मृणाल ठाकूर आणि धनुष प्रेमसंबंधात ? वारंवार एकत्र दिसल्यामुळे अफवांचा बाजार गरम…
Comments are closed.