22 वर्षापुर्वी रिलीज झालेलं हे गाणं आजही लोकांच्या आहे ओठांवर, 5 मिनिटांत सांगते प्रेमाची गोष्ट – Tezzbuzz

बॉलीवूड चित्रपट एक नेहमी गाजतात कारण त्यातील कथाही उत्तम असते परंतु कथा आणि त्या कथेला पूर्ण करण्यासाठी किंवा आणण्यासाठी त्यातील गाणे महत्त्वाचे आणि उपयुक्त ठरतात. हिंदी चित्रपटातील अनेक गाणे असे आहेत. जे जुने झाले तरी प्रेक्षकांना भावतात. असेच उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेले आणि संगीतकार हिमेश रेशमिया यांनी संगीतात ओतलेल्या कोमलतेने लोकांच्या हृदयाला स्पर्श केला. 22 वर्षांनंतरही हे गाणे तितकेच ताजे आणि भावपूर्ण वाटते.

हे गाणे म्हणजे  ‘आँखे बंद करके’ या गाण्याची लोकप्रियता आजही तिथकिच आहे. आजही हे गाणे अनेकदा इंस्टाग्राम रील्स, यूट्यूब व्हिडिओ आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पार्श्वसंगीत म्हणून वाजवले जाते. हे या गोष्टीचा पुरावा आहे की खरे संगीत काळाच्या मर्यादा ओलांडते. जुन्या गाण्यांचे चाहते असोत किंवा नवीन पिढी, या गाण्याचा मधुरपणा प्रत्येकाला मोहित करतो.

‘आँखे बंद करके’ हे गाणे 'आक्षेप' (aitraaj)या चित्रपटातील आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शिन अब्बास-मुस्तन यांनी केले होते. तसेच हा चित्रपट त्यातील उत्तम गाण्यासाठी ओळखला जातो. या चित्रपटात अक्षय कुमार आणि करीना कपूर यांच्यासोबत प्रियांका चोप्रा, अमरीश पुरी यांनी भूमिका साकारल्या होत्या. प्रियांकाने साकारलेली सोनिया रॉयची नकारात्मक भूमिका त्या वेळी खूप गाजली होती. तर तिच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. अंदाजे 11 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अंदाजे 26 कोटी रुपयांची कमाई केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

प्रकाश राजचा थलपथी यांना पाठिंबा, राज्यपालांवर केले प्रश्नचिन्ह उपस्थित

Comments are closed.